कै.श्रीपाद कुलकर्णी स्मृती खुल्या आंतरराष्ट्रीय गुणांकन बुद्धिबळ स्पर्धा 4 ते 8 डिसेंबर दरम्यान कोल्हापुरात
कै.श्रीपाद कुलकर्णी स्मृती खुल्या आंतरराष्ट्रीय गुणांकन बुद्धिबळ स्पर्धा 4 ते 8 डिसेंबर दरम्यान कोल्हापुरात
यावर्षी जलद व नियमित अश्या सलग दोन आंतरराष्ट्रीय गुणांकन स्पर्धा रंगणार
कोल्हापूर 29 सिटी न्यूज नेटवर्क
कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे संस्थापक सचिव व प्रसिद्ध उद्योगपती व सारस उद्योग समुहाचे संस्थापक कै.श्रीपाद कुलकर्णी यांच्या द्वितीय स्मृती प्रित्यर्थ कोल्हापुरात जलद व नियमित अश्या दोन खुल्या आंतरराष्ट्रीय गुणांकन बुद्धिबळ स्पर्धा चेस असोसिएशन कोल्हापूर ने आयोजित केल्या आहेत.अखिल भारतीय बुद्धिबळ संघटना,महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना व कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ यांच्या मान्यतेने व सहकार्याने या स्पर्धा होत आहेत.
या स्पर्धा न्यू एज्युकेशन सोसायटीच्या राम गणेश गडकरी सभागृह, पेटाळा,कोल्हापुर येथे चार ते आठ डिसेंबर दरम्यान होणार आहेत. पाच दिवस चालणाऱ्या या दोन स्पर्धे पैकी पहीली स्पर्धा रविवारी चार डिसेंबर ला प्रथम श्रीपाद कुलकर्णी स्मृति जलद आंतरराष्ट्रीय गुणांकन बुद्धिबळ स्पर्धा स्विस् लीग पद्धतीने जलद बुद्धिबळाच्या आंतरराष्ट्रीय नियमानुसार एकूण नऊ फेऱ्यात होणार आहेत.त्यानंतर पाच तारखेपासून आठ तारखेपर्यंत द्वितीय श्रीपाद कुलकर्णी स्मृति खुल्या आंतरराष्ट्रीय गुणांकन बुद्धिबळ स्पर्धा चार दिवस स्विस लीग पद्धतीने एकूण आठ फेऱ्यात होणार आहेत.
अशा प्रकारे जलद व नियमित सलग दोन आंतरराष्ट्रीय गुणांकन बुद्धिबळ स्पर्धा कोल्हापुरात होत असल्यामुळे कोल्हापूरच्या नवोदित बुद्धिबळपटूना जलद व नियमित आंतरराष्ट्रीय गुणांकन मिळविण्याची व गुणांकन प्राप्त बुद्धिबळपटूना गुणांकन वाढवण्याची संधी निर्माण झाली आहे.
जलद व नियमित अशा दोन सलग आंतरराष्ट्रीय गुणांकन बुद्धिबळ स्पर्धा खेळण्याची संधी मिळत असल्यामुळे बुद्धिबळपटूत उत्साहाचे वातावरण पसरले आहे.
सारस ग्रुपचे श्रीनिवास कुलकर्णी यांनी आपल्या वडिलांच्या (चार डिसेंबर) जयंतीनिमित्त व स्मृतीप्रित्यर्थ स्पर्धा पुरस्कृत केल्या आहेत. या दोन्ही स्पर्धेतील विजेत्यांना प्रत्येक स्पर्धेसाठी एकूण एक लाख रुपयांचे रोख बक्षिसे व चषक आणि मेडल्स बक्षीस म्हणून ठेवली आहेत.दोन्ही स्पर्धेत मिळून एकूण दोन लाख रुपये ची बक्षीस आहेत. प्रथम श्रीपाद कुलकर्णी स्मृती खुल्या जलद आंतरराष्ट्रीय गुणांकन बुद्धिबळ स्पर्धा विजेत्याला रोख पंधरा हजार रुपये व चषक देऊन गौरविले जाणार आहे.उपविजेत्यास रोख दहा हजार रुपये व चषक तर तृतीय क्रमांकास रोख साडेसात हजार रुपये व चषक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.पहिल्या 40 क्रमांकांना रोख बक्षिसे ठेवली आहेत.4)रु.6,000/- 5)रु.5,000/6)रु.4,000/ 7) रु.3,000/8)रु.2,000/ 9)रु.1,500/ 10)1,000/- क्र.11ते 20 प्रत्येकी रु.700/ क्र.21 ते 25 प्रत्येकी रु.6,00/ व क्र.26 ते 40 प्रत्येकीरु.500/ याशिवाय विविध वयोगटात सात, नऊ,अकरा, तेरा व पंधरा वर्षाखालील,उत्कृष्ट महिला बुद्धिबळपटू ,उत्कृष्ट ज्येष्ठ बुद्धिबळपटू, उत्कृष्ट दिव्यांग बुद्धिबळपटू व उत्कृष्ट कोल्हापुरातील बुद्धिबळपटू या प्रत्येक गटात दहा बक्षिसे रोख,चषक व मेडल स्वरूपात उत्तेजनार्थ म्हणून देण्यात येणार आहेत.सर्व मिळून एकूण 150 बक्षिसे आहेत.यानंतर पाच डिसेंबर पासून सुरु होणारी द्वितीय श्रीपाद कुलकर्णी स्मृती खुल्या आंतरराष्ट्रीय गुणांकन बुद्धिबळ स्पर्धा विजेत्याला एकवीस हजार रुपयांचे रोख बक्षीस व चषक आणि कै.श्रीपाद कुलकर्णी स्मृती भव्य फिरता चषक बक्षीस म्हणून देवून गौरविले जाणार आहे.द्वितीय क्रमांकास रोख रुपये पंघरा हजार व चषक तर तृतीय क्रमांकास रोख रुपये दहा हजार व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे.
4)रु.7,500/-,5)रु.5,000/-,6)रु.4,000/-,7)रु.3,000/-,8)रु.2,500/-,9)रु.2,000/-,10)रु.1,800/-,11)रु.1,700/-,12)रु.1,500/-,13)रु.1,300/-,14)रु.1,200/-,15)रु.1,000/- )
अशी अनुक्रमे एकूण पहिल्या पंधरा क्रमांकास रोख बक्षिसे ठेवली आहेत. याशिवाय गुणांकन तेराशे,सोळाशे व एकोणवीसशे खालील उत्कृष्ट पाच बुद्धिबळपटूना व 60 वर्षावरील ज्येष्ठ बुद्धिबळपटू, उत्कृष्ट महिला बुद्धिबळपटू व उत्कृष्ट बिगरमानांकित बुद्धिबळपटू अशा प्रत्येक गटातील पहिल्या पाच खेळाडूंना अनुक्रमे १)रु.1,500/-,२)रु.1,250/-३)रु.1,000/-,४ व ५) मेडल अशी बक्षिसे आहेत.त्याचबरोबर वयोगटात सात, नऊ ,अकरा, तेरा व पंधरा वर्षाखालील उत्कृष्ट पाच मुलांना चषक प्रदान करण्यात येणार आहे व स्थानिक कोल्हापूर जिल्ह्यातील उत्कृष्ट पाच बुद्धिबळपटूना प्रत्येकी चषक बक्षिस म्हणून ठेवले आहे अशी एकूण सर्व मिळून पंच्याहत्तर बक्षिसे जाहीर केली आहेत.
प्रत्येक स्पर्धेत भाग घेण्यासाठी ग्रँड मास्टर,महिला ग्रँड मास्टर,आंतरराष्ट्रीय मास्टर व महिला आंतरराष्ट्रीय मास्टर्सना मोफत प्रवेश दिला आहे त्याचबरोबर त्यांची मोफत राहण्याची व जेवणाची व्यवस्था केली आहे.त्या व्यतिरिक्त इतर सर्व गुणांकन व बिगरगुणांकन प्राप्त बुद्धिबळपटूना प्रत्येकी फक्त पाचशे रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात आला आहे. आतापर्यंत स्पर्धेत महाराष्ट्र,गोवा,मध्यप्रदेश,कर्नाटक, दिल्ली येथील जवळजवळ 100 बुद्धिबळपटूनी सहभाग नोंदवला आहे. त्यामध्यें एक आंतरराष्ट्रीय मास्टरसह एकूण चाळीस बुद्धिबळपटू आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त आहेत. मर्यादित फक्त 250 प्रवेश दिले जाणार आहेत...
इच्छुक बुद्धिबळपटूंनी आपली नांवे ऑनलाईन पद्धतीने एक डिसेंबर पर्यंत नोंदवावीत.अधिक माहितीसाठी छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथील कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या कार्यालयात संध्याकाळी सहा ते आठ या वेळेत संपर्क साधावा.किंवा भरत चौगुले - 7620067251, मनीष मारुलकर - 9922965173,धीरज वैद्य98 23127323 उत्कर्ष लोमटे - 9923058149 व प्रीतम घोडके - 8208650388 यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधावा. असे आवाहन संघटनेचे विश्वविजय खानविलकर, प्राध्यापक अरुण मराठे, अनिल राजे, श्रीनिवास कुलकर्णी, एडवोकेट अजित कुलकर्णी,आंतरराष्ट्रीय पंच भरत चौगुले, धीरज वैद्य, मनीष मारुलकर,उत्कर्ष लोमटे,प्रीतम घोडके यांनी आवाहन केले आहे.
Comments
Post a Comment