कोल्हापूर जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करून तातडीने शेतकऱ्यांना मदत करा : अरुण दूधवडकर,
कोल्हापूर ०८ सिटी न्यूज नेटवर्क
कोल्हापूर जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करून अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई म्हणून 50 हजार रु हेक्टरी मदत जाहीर करावी यासाठी सांगली- कोल्हापूर महामार्गावर चाक्काजाम आंदोलन शिवसेना उपनेते तथा संपर्कप्रमुख अरूनभाई दुधवडकर ,मा.आमदार डॉ सुजित मिणचेकर, मा.आमदार उल्हास दादा पाटील,जिल्हा प्रमुख मुरलीधर जाधव,तसेच महिला जिल्हा प्रमुख मंगलताई चव्हाण,युवासेना जिल्हा प्रमुख शिवाजी पाटील, यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.
आंदोलनासाठी शिवसेना,युवासेना महिला आघाडीच्या उपजिल्हा प्रमुख,तालुकाप्रमुख, उपतालुका,प्रमुख,शेतकरी बांधव जिल्ह्यातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Comments
Post a Comment