शनिवार, २६ नोव्हेंबर २०२२
मार्गशीर्ष शुक्ल तृतीया हेमंत, ऋतू. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)
राहुकाळ - सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०
"आज चांगला दिवस आहे.
आज चंद्र केतूच्या 'मूळ' नक्षत्रात 'धनू' राशीत आहे.
मेष:- रवी हर्षल योग अनुकूल परिस्थिती निर्माण करेल. त्याचा फायदा घ्या. मेहनत करा. चूका करू नका. वरिष्ठ नाराज होऊ शकतात. शांत आणि संयमी रहा.
वृषभ:- कामाच्या ठिकाणी उत्साह वाढवणाऱ्या घटना घडतील. व्यवसायात वाढ होईल. नवनवीन कल्पना सुचतील. कर्जे मंजूर होतील.
मिथुन:- अचानक लाभ होतील. धावपळ वाढेल. उष्णतेचे विकार संभवतात. जोडीदाराची काळजी घ्या. मन भरकटू देऊ नका. प्रेमात यश मिळेल.
कर्क:- उत्तम आर्थिक लाभाचा दिवस आहे. संधी चालून येतील. प्रतिष्ठा वाढेल. मान सन्मान मिळतील. येणी वसूल होतील.
सिंह:- कामात अडथळे येतील. प्रगतीची वाटचाल चालू ठेवा. सौख्य लाभेल. धाडसी निर्णय घ्याल. संतती कडून सुखद समाचार समजतील.
कन्या:- अनुकूल दिवस आहे. उगाच कोणाशीही तुलना नको. मन शांत ठेवा. वास्तू संबंधित कामे मार्गी लागतील. रेंगाळलेली प्रकरणे पुढे सरकू शकतात. पाठपुरावा आवश्यक आहे.
तुळ:- उत्तम आर्थिक लाभाचा दिवस आहे. मन प्रसन्न राहील. दिवस आनंदी जाईल. आर्थिक तूट भरून निघेल. भावंड मदत करतील. नात्यातून लाभ होतील.
वृश्चिक:- कलाकारांना यश मिळेल. वक्तृत्व चमकेल. आर्थिक विकास होईल. विनाकारण वाद टाळा. संयम बाळगा.
धनु:- संतती बाबत शुभ समाचार समजतील. धाडसी निर्णय लाभदायक ठरतील. आत्मविश्वास वाढेल. उपासना लाभदायक ठरेल. सौख्य लाभेल.
मकर:- क्रोधावर नियंत्रण ठेवा. हितशत्रूंच्या कारवाया वाढतील. विचारपूर्वक निर्णय घ्या. राजकीय वाटचाल विचारपूर्वक करा. आज अनुकूल दिवस आहे.
कुंभ:- प्रतिष्ठा वाढेल. अनुकुल घटना घडतील. तुमची कीर्ती दिगंत पसरेल. मान सन्मान मिळतील. आर्थिक लाभ होतील. नात्यातून शुभसंदेश प्राप्त होईल.
मीन:- कामाच्या ठिकाणी अनुकूल अनुभव येतील नवीन संधी मिळतील. व्यवसायात वाढ होईल. कर्जे मंजूर होतील. पैसे येतील.
(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी - 8087520521)
Comments
Post a Comment