दैनिक राशिभविष्य

 गुरूवार, ३ नोव्हेंबर २०२२







. कार्तिक शुक्ल दशमी. शरद ऋतू.   राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)


राहुकाळ - दुपारी १.३० ते दुपारी ३.००


"आज उत्तम दिवस आहे." 


चंद्रनक्षत्र - शततारका 


टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.


मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) सौख्य लाभेल. उत्तम आर्थिक प्राप्ती होईल. मन प्रसन्न राहील.

     

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) वरिष्ठ खुश होतील. कामातून लाभ होतील. नवीन ओळखी होतील. 

 

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) अचानक धनलाभ संभवतो. भौतिक सुखे लाभतील. व्यसने टाळा.


कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) ग्रहमान अनुकूल नाही. मन शांत ठेवा. आरोग्य सांभाळा. प्रलोभने टाळा. 

 

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) प्रेमात यश मिळेल. शुभ समाचार समजतील. घरात शांतता राखा.

  

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) अत्यंत उत्तम दिवस आहे. वेळ दवडू नका. संधीचे सोने करा.

 

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) कलाकारांना यश मिळेल. जोडीदाराकडून अपेक्षा वाढतील. कौटुंबिक सुख लाभेल.

 

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) जमीन किंवा वस्तू संबंधित कामे मार्गी लागतील. घरात मोठे बदल कराल. मातेकडून लाभ संभवतात.


धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) आत्यंतिक सुखाचा दिवस आहे. आर्थिक प्राप्ती चांगली होईल. येणी वसूल होतील. 

 

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) शब्दात अडकू नका. विचारपूर्वक कृती करा. कुटुंबास वेळ द्यावा लागेल.


कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) मेजवानी चे योग आहेत. छोटी सहल घडेल. सौख्य लाभेल.

 

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची)  मनावर ताबा ठेवा. आर्थिक नियोजन करा. व्यसने टाळा. आज नुकसान संभवते. 


(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी -  8087520521)


 ३ नोव्हेंबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-


     तुमच्यावर मंगळ आणि गुरू या दोन ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्ही अत्यंत महत्त्वाकांक्षी असून आयुष्यात सतत पुढे जाण्याचा विचार करत असतात. तुमच्याकडे ज्ञान आहे मात्र त्याचा अहंकार टाळला पाहिजे. तुमचा कर्मकांडावर विश्वास नसतो. तुम्ही नेहमी योग्य व्यक्तीला मदत करतात. तुम्ही न्याय प्रेमी असून तुम्हाला शुद्ध प्रेमाची आवड आहे. इतरांच्या प्रगतीसाठी तुम्ही कष्ट करतात आणि अडचणीत असलेल्या लोकांना मदत करतात. तुम्ही उत्साही आणि क्रियाशील आहात परंतु शीघ्रकोपी आहात. इतरांवर तुम्ही वर्चस्व गाजवतात. एखाद्या मोठ्या कारखान्याचे तुम्ही उत्कृष्टपणे संचालन करू शकतात. तुमचा स्वतंत्र बाणा आहे आणि तुमची जबाबदारी तुम्ही चोख पार पाडतात. तुमच्या कामात ढवळाढवळ केलेली तुम्हाला आवडत नाही. तुम्ही स्वतःचे डोके शांत ठेवल्यास कोणतीही गोष्ट मिळवणे तुम्हाला अशक्य नाही.  तुम्ही दयावान आणि नीतिमान आहात. तुम्हाला मोठ्याने बोलण्याची सवय असते. तुमच्यामध्ये पुरेपूर आत्मविश्वास आहे. तुम्ही व्यवस्थित आणि दिमाखदार आहात. तुमच्या बोलण्यामध्ये एक प्रकारचा मोकळेपणा असतो. तुम्हाला अनेक खेळांची आवड असते. तुम्हाला उत्तम विनोद बुद्धी लाभलेली आहे. तुम्ही हट्टीपणा आणि अहंकार टाळला पाहिजे.


व्यवसाय:-  न्यायाधीश, सचिव, सामाजिक कार्यकर्ता, धार्मिक गुरु, शिक्षक, कारखानदार, सावकार, जाहिरात वितरक, अभिनेता, मॅनेजिंग डायरेक्टर.


शुभ दिवस:- मंगळवार, गुरुवार आणि शुक्रवार.


शुभ रंग:- अंजिरी, पिवळा आणि जांभळा.


शुभ रत्न:- पुष्कराज, अमेठीस्ट आणि लसण्या.

(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)


*व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या*


*कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521*

 http://mangeshpanchakshari.blogspot.com/2022/10/blog-post_90.html

Comments