शुक्रवार, २५ नोव्हेंबर २०२२.
मार्गशीर्ष शुक्ल द्वितीया, हेमंत ऋतू. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)
राहुकाळ - सकाळी १०.३० ते दुपारी १२.००
"आज संध्याकाळी ५.०० नंतर चांगला दिवस आहे"
चंद्र नक्षत्र :- जेष्ठ
मेष:- अकल्पित घटना घडतील. वरिष्ठ एखादी कठीण जबाबदारी सोपवतील. धनलाभ होईल. धावपळ वाढेल. आरोग्य सांभाळा.
वृषभ:- जोडीदाराकडून चमत्कारिक मागणी होऊ शकते. संवाद साधा. शुभ समाचार समजतील. आत्मविश्वास वाढेल.
मिथुन:- पूर्वार्धात उत्तम आर्थिक लाभ होतील. अधिकाराचा योग्य वापर कराल. उत्साह वाढेल. प्रवासात काळजी घ्या. उत्तरार्ध अधिक काळजी घ्या.
कर्क:- पूर्वार्धात कामात अडथळे येतील मात्र उत्तरार्धात आर्थिक लाभ होतील. सौख्य लाभेल. वरिष्ठ नाराज होऊ शकतात. कामाच्या ठिकाणी काळजी घ्या.
सिंह:- व्यसने टाळा. मोह आवरा. व्यवहार करताना काळजी घ्या. आरोग्य सांभाळा. घरात अशांतता निर्माण होऊ शकते. नम्रता बाळगा.
कन्या:- सकाळच्या सत्रात उत्तम आर्थिक लाभ होतील. अंदाज खरे ठरतील. हितशत्रू पासून सावध रहा. उत्तरार्ध घरगुती कटकटीचे असू शकतो. शेतीची कामे रंगळतील.
तुळ:- उत्तरार्धात चांगला आर्थिक लाभ होईल मात्र खर्चात देखील वाढ होणार आहे. उत्तम संवाद कौशल्य कामास येईल.
वृश्चिक:- अंदाज न येणाऱ्या घटना घडतील. नियोजनात बदल होईल. कामे रेंगाळतील. अडकून पडाल. आर्थिक लाभ होतील मात्र ते मिळण्यास उशीर लागेल.
धनु:- सकाळी विनाकारण खर्चात वाढ होणार आहे. कटकटी मागे लागतील. उत्साह मावलेल मात्र दुपारी परिस्थिती बदलेल. आत्मविश्वास वाढेल.
मकर:- अकल्पित अनुभव येतील. गुंतवणूक कामी येईल. उत्तम आर्थिक लाभाचा दिवस आहे. घवघवीत यश मिळेल. संधी चालून येतील.
कुंभ:- दीर्घकालीन गुंतवणूक करण्यास योग्य दिवस आहे. सुखाचा कालावधी आहे. गृहसौख्य लाभेल. मन प्रसन्न राहील. व्यवहारात पारदर्शकता ठेवा.
मीन:- सकाळी मन अस्वस्थ राहील. उपासना लाभदायक ठरेल. मात्र नंतर परिस्थिती बदलेल. कामे मार्गी लागतील. अनुकूलता वाढेल.
(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी - 8087520521)

Comments
Post a Comment