अवनी संस्थेतर्फे उबदार कपडे संकलन सुरू
कोल्हापूर 30 सिटी न्यूज नेटवर्क
अवनी संस्थेतर्फे दसरा चौक येथे उबदार कपडे संकलन सुरू करण्यात आले आहे . हे संकलन केंद्र आठ दिवस मुस्लिम बोर्डिंग दसरा चौक येथे सुरू राहणार आहे.
चिमुकल्यांना हवी आहे आपुलकीची ऊब..
आपण सर्वजण थंडीच्या बचावापासून पक्या घरामध्ये स्वेटर, गरम कपडे परिधान करतो, त्यांची खरेदी करत असतो. पण शाहुंच्या नगरीत ऊसतोड मजुरांची लहान मुले असतील किंवा समाजातील इतर वंचित घटक असतील ही लोकं आपल्या झोपडीत राहून थंडीचा कशाप्रकारे बचाव करत असतील याचा विचार केला आहे का..?
अंगाला झोंबणाऱ्या थंडीत मुले आईच्या कुशीत शिरतात. कोणाच्या अंगावर फाटकी चड्डी, कोणाच्या अंगावर केवळ सदराच तर कोणाला कपडेच नाहीत. थंडीचे दिवस सुरू झालेत अशात जिल्ह्यातील वीटभट्टी आणि साखर कारखान्यांवरील ऊसतोड कामगारांच्या चिमुकल्यांना आपुलकीची ऊब हवी आहे. यासाठी अवनि संस्थेने पुढाकार घेतला असून सुमारे 1500 बालकांना ऊबदार कपड्यांची गरज असल्याने समाजातील दानशूर व्यक्तींना तसेच संस्था, संघटना व नागरिकांना आपुलकीचा हात पुढे करण्याचे आवाहन संस्थेतर्फे करण्यात येत आहे. या उपक्रमात सहभागी होऊन आपण ऊबदार कपडे, स्वेटर, ब्लॅंकेट अशा स्वरूपात वस्तू दसरा चौक, मुस्लिम बोर्डिंग येथे तसेच जिवबानाना जाधव पार्क येथील अवनि कार्यालयात व रात्र निवारा परीख पूल शेजारी एकटी संस्था येथे दान करू शकता असे आवाहन संस्थेच्या अध्यक्षा अनुराधा भोसले यांनी केले आहे.
सदर उपक्रम संस्थेच्या अध्यक्षा अनुराधा भोसले, उपाध्यक्ष संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर, सांगली, सातारा येथे सुरु असून याचे संयोजन इम्रान शेख, अनिकेत कदम, साताप्पा मोहिते, अमर कांबळे, रवि कुऱ्हाडे, अक्षय पाटील, विक्रांत जाधव व आदी करत आहेत.
Comments
Post a Comment