शुक्रवार, ४ नोव्हेंबर २०२२.
कार्तिक शुक्ल एकादशी. शरद ऋतू. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)
राहुकाळ - सकाळी १०.३० ते दुपारी १२.००
"आज सकाळी ७.०० पर्यंत चांगला दिवस, *प्रबोधिनी एकादशी* आहे " पंढरपूर यात्रा. घबाड संध्याकाळी ६.०९ नंतर.
चंद्रनक्षत्र: पूर्वा भाद्रपदा
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) पूर्वार्ध चांगला आहे. धार्मिक कार्यात भाग घ्याल. आध्यत्मिक प्रगती साधेल.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) अनुकूल दिवस आहे. सौख्य लाभेल. मन प्रसन्न राहील. वारसा हक्काची कामे मात्र रेंगाळतील.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) सरकारी कामात चालढकल नको. अनुकूलता नाही. संयम ठेवा.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) सौख्य लाभेल. स्वप्ने साकार होतील. दूरचे प्रवास घडतील. उत्तरार्ध अनुकूल आहे.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) पूर्वार्ध चांगला आहे. नंतर धावपळ वाढेल. मन शांत ठेवा. फसवणूक होऊ शकते.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) अनुकूल दिवस आहे. सुसंधी चालून येतील. शुभ समाचार समजतील. सन्मान मिळेल.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) संमिश्र दिवस आहे. आर्थिक लाभ होतील. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) अडथळे दूर होऊ लागतील. मार्ग सापडेल. स्पर्धेत यश मिळेल. विचारपूर्वक निर्णय घ्या.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) खर्चात वाढ होऊ शकते. प्रलोभने टाळा. महत्वाची कामे आज नकोत.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) मानसिक सुख लाभेल. मन आनंदी राहील. आर्थिक उन्नती होईल.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) प्रतिष्ठा पणास लागेल. अपमानास्पद वागणूक मिळू शकते. कुटुंबास वेळ द्याल.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) संवादातून यश मिळेल. छोटी सहल घडेल. आत्मविश्वास वाढेल. संध्याकाळ आनंदाची.
(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी - 8087520521)
४ नोव्हेंबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-
तुमच्यावर हर्षल आणि मंगळ या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमच्या जीवनात अनेकदा विरोधाभास जाणवतो. आयुष्यात बरेच चढ -उतार येतात. अनेक अनपेक्षित गोष्टींचा अनुभव येतो. तुम्ही तुमच्या व्यवसायात तसेच मित्रांमध्ये बदल करतात. तुम्ही उत्साही आणि प्रगतिशील आहात. तुमच्या मनाची पातळी खूप वरच्या दर्जाची असते. मानव जातीच्या कल्याणासाठी तुम्ही तुमच्या बुद्धीचा उपयोग करतात. जुन्या परंपरा तुम्हाला आवडत नाहीत. तुमचे व्यक्तिमत्व आकर्षक आणि प्रामाणिक असते. तुमचा स्वभाव परखड असून इतरांचे विचार तुम्हाला सहजासहजी पटत नाहीत. तुमच्या स्पष्ट वक्तेपणामुळे लोक दुखावले जातात. तुमच्या कामात कोणाची ढवळाढवळ तुम्हाला सहन होत नाही. तुम्ही डोके शांत ठेवून काम केल्यास आयुष्यात तुम्हाला चांगले यश मिळू शकते. तुम्ही निर्भय असून कोणत्याही धोक्यास तोंड देण्याची तुमची तयारी असते. आयुष्यात सतत बदल हवा असतो त्यामुळे मनातून तुम्ही अवस्थ असतात. कौटुंबिक वादांपासून आणि नातेवाईकांपासून कधीकधी त्रास होऊ शकतो.
व्यवसाय:- व्यवसायासाठी कोणतेही क्षेत्र तुम्हाला वर्ज्य नाही मात्र राजकीय नेते, जाहिरात माध्यम, इंटरियर डेकोरेटर, बँकिंग, आयात निर्यात, डॉक्टर, इंजिनिअरिंग, बांधकाम व्यवसाय, स्पेशालिस्ट डॉक्टर, इलेक्ट्रॉनिक, कॉम्प्युटर यात अधिक लाभ होतात.
शुभ दिवस:- रविवार, सोमवार आणि शनिवार.
शुभ रंग:- पांढरा, निळा आणि गुलाबी.
शुभ रत्न:- हिरा मोती आणि पोवळे.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)
*व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या*
*कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521*

Comments
Post a Comment