महापालिकेच्या निषेधार्थ गांधी मैदानावर 'मिसळ' पार्टी : मैदानाच्या दुरवस्थेकडे 'आप'ने वेधले लक्ष

 महापालिकेच्या निषेधार्थ गांधी मैदानावर 'मिसळ' पार्टी 

मैदानाच्या दुरवस्थेकडे 'आप'ने वेधले लक्ष


कोल्हापूर २९ सिटी न्यूज नेटवर्क

शहरातील गजबजलेल्या वस्तीत असलेले एकमेव प्रशस्त मैदान म्हणून गांधी मैदानाची ओळख आहे. परंतु गेल्या काही वर्षांपासून या मैदानाला समस्यांचे ग्रहण लागले आहे. पावसाळ्यात तर मैदानाला तळ्याचे स्वरूप येते. आजूबाजूच्या गटारींमधून येणारे दुर्गंधीयुक्त पाणी अनेक दिवस साचून राहते. तळीरामांचा वावर असल्याने मैदानावर काचांचा खच पडलेला असतो.


या सर्व समस्यांवर काम करण्यासाठी महापालिकेने विशेष टास्कफोर्स नेमून उपाययोजना कराव्यात अशी मागणी 'आप'च्या शिष्टमंडळाने प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्याकडे केली होती, परंतु मागण्यांवर अद्याप कार्यवाही न झाल्याने आम आदमी पार्टीच्या वतीने गांधी मैदानावर 'मिसळ' पार्टी करून निषेध करण्यात आला. 


गांधी मैदानात अक्षरशः दगड-मुरूम टाकलेला आहे. यामुळे अनेक खेळाडूंना दुखापत झालेली आहे. एकीकडे फुटबॉलचा हंगाम तोंडावर असताना अनेक आंतराष्ट्रीय फुटबॉल खेळाडू कोल्हापूरमधील स्थानिक संघांकडून खेळायला येत असताना त्यांना देखील सरावाला मैदान नाही ही वस्तुस्थिती आहे. या दुरवस्थेवर स्थानिक खेळाडूंनी महापालिका प्रशासनाला धारेवर धरत प्रश्नांनी सरबत्ती केली. वेळीस मैदान सुस्थितीत झाले नाही तर महापालिकेसमोर सराव करण्यात येईल अशा इशारा देण्यात आला.


यावर उपशहर अभियंता एन एस पाटील यांनी पुढील पंधरा दिवसात मैदानाचे सपाटीकरण करू असे आश्वासन 'आप' पदाधिकाऱ्यांना दिले. पाटील यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. 


यावेळी जिल्हाध्यक्ष निलेश रेडेकर, अभिजित कांबळे, संजय साळोखे, सचिन वणीरे, किशोर खाडे, रवींद्र राऊत, ऍड. चंद्रकांत पाटील, उत्तम पाटील, मोईन मोकाशी, आदम शेख, डॉ. कुमाजी पाटील, मयूर भोसले, रवींद्र ससे, समीर लतीफ, अमरसिंह दळवी, संग्राम पाटील, ऍड. रणजित कवाळे, शशांक लोखंडे, श्री शिवाजी तरुण मंडळ, खंडोबा तालीम मंडळ, बीजीएम स्पोर्ट्स, झुंजार क्लब, कै. राणादा क्रिकेट स्पोर्ट्स, मिलिंद पोवार भोजनालय स्पोर्ट्स, गांधी मैदान स्पोर्ट्स, अवचित पीर तालीम येथील खेळाडू व परिसरातील नागरिक उपस्थित होते.

Comments