ध्येयवेड्या पावले दाम्पत्य " सावली " पुरस्काराने सन्मानित

 ध्येयवेड्या पावले दाम्पत्य " सावली " पुरस्काराने सन्मानित...!




कोल्हापूर : दि 25 सिटी न्यूज नेटवर्क

बुलढाणा येथील सेवा संकल्प संस्थेचे डॉ नंदकुमार पालवे आणि त्यांची धर्मपत्नी सौ आरती पालवे या मानवसेवा करणाऱ्या दाम्पत्यांना आज पिरवाडी येथील सावली केयर सेन्टर या संस्थेमार्फत दिला जाणारा पहिला सावली सेवाव्रती पुरस्कार पावले दाम्पत्यांना समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला..

प्रास्ताविक सावलीचे सर्वेसर्वा किशोर देशपांडे यांनी केले यामध्ये त्यांनी सावलीच्या स्थापनेपासूनच्या 18 वर्षाच्या कार्याचा आढावा घेतला..


सेवा संकल्प संस्थेच्या पावले दाम्पत्यांना जेष्ठ पत्रकार उदय कुलकर्णी यांच्या हस्ते गौरविण्यात आले.या पहिल्या पुरस्कारामध्ये शाल श्रीफळ स्मृतिचिन्ह तुकाराम गाथा कोल्हापूरी गूळ रोख 51 हजार रुपये आदींचा समावेश होता.

  

कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्या डॉ गीता पिलाई हॉटेल मालक संघाचे सचिन शानबाग हृदयस्पर्श फौंडेशन चे सेवाव्रती पद्माकर कापसे मा नगरसेवक अजित ठाणेकर आदींनी मनोगते व्यक्त केली समारंभाचे प्रमुख पाहुणे पत्रकार उदय कुलकर्णी यांनी बोलताना सांगितले की कोणत्याही पुरस्काराने त्या त्या व्यक्तीच्या कार्याचा गौरव होतोच पण त्यानी केलेल्या कार्याचा आरसा समाजापुढे प्रतिबिंबित होतो. आज समाजजीवन एकलकोंडे बनत असल्याने मानसिक रोग वाढत आहेत त्यातून मनोरुगणांची संख्याही वाढत आहे या मनोरुगणांना सांभाळणारी व्यवस्था म्हणून बुलढाण्याची सेवा संकल्प संस्था करते आहे अशा संस्थाना पुरस्काररूपांनी गौरविण्यात आले पाहिजे सावली संस्था अशा सामाजिक संस्थेना मायेची प्रेमाची ऊब देणारी संस्था म्हणून सावली संस्था आहे..


यावेळी डॉ नंदकुमार पालवे आणि आरती पालवे यांच्या आजपर्यंतच्या जीवनप्रवासावर प्रकाशझोत टाकून त्यांच्या एकंदरीतच कार्याबद्दलची माहिती प्रकट मुलाखतद्वारे घेतली. ही मुलाखत लेखिका साहित्यिकां डॉ सोनाली नावांगुळ यांनी घेतली....या कार्यक्रमाला सावली केयर सेंटरमधील निवासी त्यांचे निकटवर्तीय आणि विविध क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते..!

Comments