रिलायन्स रिटेलच्या वतीने आजिओ बिझनेसवर अॅथलिजर ब्रँड एक्सलेरेटचा शुभारंभ

 

रिलायन्स रिटेलच्या वतीने आजिओ बिझनेसवर अॅथलिजर ब्रँड एक्सलेरेटचा शुभारंभ



भारतीय अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पांड्या याची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून निवड

मुंबई 01 सिटी न्यूज नेटवर्क

रिलायन्स रिटेलच्या वतीने अॅथलिजर ब्रॅंड, एक्सलेरेट हा त्यांचा नवीन वाणिज्य मंच लॉन्च केला. या ब्रँडच्या माध्यमातून खेळ आणि तंदुरुस्ती क्षेत्रातील अभिनव गरज लक्षात घेऊन फिटनेस प्रवासातील स्टाईल आणि आरामविषयक सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. ग्राहकांना उद्योग-प्रणीत स्टाईल आणि सुलभता प्रदान करणारे वैविध्यपूर्ण गुणवत्तेचे स्पोर्टींग मर्कण्डाईज आणि फूटवेअर उपलब्ध होईल.



एक्सलेरेटमध्ये प्रत्येक किंमतीकरिता काही उत्पादन पर्याय उपलब्ध आहेत, इथे मिळणारी काही उत्पादने तर 699 पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध आहेत. त्यांनी ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या याची निवड केली आहे. पांड्या हा त्याची स्टाईल, तरुणाईला प्रेरणा देणारं व्यक्तिमत्व आणि कधीही हार न पत्करण्याच्या वृत्तीसाठी लोकप्रिय आहे – ब्रॅंडची सर्व वैशिष्टे त्याच्यात दिसतात.

एक्सलेरेट’मध्ये तंदुरुस्ती-प्रती सजग भारतीय तरूण पुरूष आणि महिलांचा भाव प्रतिबिंबित होतो, जे खेळात सक्रिय सहभाग दर्शवतात. खेळ विश्वात भारतीयांनी जागतिक कीर्तिमान प्रस्थापित केले आहेत. ऑलिंपिक खेळांत भारताच्या पदकतालिकेत पदकांची वाढलेली संख्या याची साक्ष देतात. त्यामुळे एक्सलेरेटचा भर अतिशय वाजवी किंमतीत तरूणाईकरिता जागतिक दर्जाचे स्पोर्ट्सवेअर उपलब्ध करून देण्याकडे आहे.

एक्सलेरेट’च्या वतीने खेळाशी निगडीत जे पर्याय उपलब्ध करून देण्यात येतात, त्यात स्पोर्ट्स शूज, अॅथलेटीक आणि लाइफस्टाईल फूटवेअर, अपेरेल्स जसे की, ट्रॅक पॅंट, टी-शर्ट, शॉर्ट्स आणि इतर साहित्य मिळते. एक्सलेरेट उत्पादनं ही खास करून आजिओ बिझनेस, भारताच्या अग्रगण्य बी2बी ई-कॉमर्स मंचांवर उपलब्ध आहेत. भारतातील कोणताही रिटेलर, मग तो अगदी लहान जनरल स्टोअर किंवा फॅशन आऊटलेट चालवणारा असो, त्याला आजिओ बिझनेसवर नोंदणी करून एक्सलेरेट उत्पादनांची ऑर्डर देता येईल. आजिओ बिझनेस रिलायन्सची लहान व मध्यम रिटेलरच्या वाढीला व कल्याणाला साह्य करण्याची महत्त्वपूर्ण वचनबद्धता वृद्धिंगत करते आणि त्यांचे डिजीटली सक्षमीकरण करते.

एक्सलेरेट लाँच प्रसंगी बोलताना, श्री अखिलेश प्रसाद, अध्यक्ष आणि सीईओ - फॅशन आणि लाईफस्टाइल, रिलायन्स रिटेल, म्हणाले, "एक्सलेरेट निश्चितपणे किंमतीविषयी जागरूक असलेल्या ग्राहकांना त्याच्या उत्कृष्ट आणि परवडणाऱ्या उत्पादन ऑफरसह आनंदित करेल. आमचा ब्रँड अॅम्बेसेडर, हार्दिक पांड्या, अडथळ्यांची चिंता न करता जीवनात पुढे जाण्याच्या त्याच्या भावनेला मूर्त रूप देतो. “डोन्ट ब्रेक, एक्सलेरेट” ही मोहीम तरुणांची उत्कटता आणि उत्साह प्रतिबिंबित करते, जे कधीही ‘नेव्हर-से-डाय’ वृत्तीने आपल्या ध्येयांचा पाठपुरावा करतात. ब्रँडेड स्पोर्ट्स शूज, सँडल आणि पोशाखांच्या श्रेणींमधील गरजा पूर्ण करतो.”

 

 

एक्सलेरेट सोबतच्या भागीदारीबद्दल बोलताना हार्दिक पांड्या म्हणाला, “एक्सलेरेट’सोबत एकत्र येण्याची संधी मिळाली म्हणून मी आनंदी आहे. माझ्या मते, त्यांच्याकडे अतिशय स्टाईलिश आणि आरामदायक उत्पादनांची श्रेणी आहे. त्यांचं ‘डोन्ट ब्रेक, एक्सलेरेट’ ब्रँड विचारधारा माझ्या जीवनाच्या तत्वज्ञानाशी मिळतीजुळती आहे, स्वत:वर विश्वास ठेवून मोठ्या गहनतेने मेहनत करत राहतो. माझी वृत्ती कायमच हार न पत्करण्याची असते आणि हाच मंत्र आजची तरुणाई पाळते हे पाहून मनात उत्साह संचारतो, एक्सलेरेट’ही अगदी सारखंच आहे. त्यामुळे काहीही होऊ द्या, थांबू नका. डोन्ट ब्रेक, एक्सलेरेट – हाच माझा युवकांना संदेश आहे.

आजिओ बिझनेस, रिलायन्स रिटेलची नवीन-वाणिज्य शाखा असून त्यांचे देशभर असलेले रिटेलर आणि व्यापारी त्यांना 5000 हून अधिक फॅशन आणि लाईफस्टाईल ब्रॅंडच्या विस्तृत पोर्टफोलियोने सशक्त करतात.

 

रिलायन्स रिटेल लिमिटेडविषयी:

 

रिलायन्स रिटेल लिमिटेड ही रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडची उपकंपनी असून आरआयएल (रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड) ग्रुप अंतर्गत सर्व रिटेल कंपन्या ताब्यात ठेवून आहे. आरआरव्हीएल’ने 31 मार्च 2022 रोजी संपलेल्या वर्षकरिता एकत्रित उलाढाल 199,704 कोटी ($26.3 अब्ज) आणि निव्वळ नफा 7,055 कोटी ($ 931 दशलक्ष)  याप्रमाणे नोंदवला.

 

रिलायन्स रिटेल हा भारतामधील सर्वदूर पोहोचलेला सर्वात मोठा आणि सर्वाधिक नफा कमावलेला रिटेलर आहे. डेलॉईट्टे ग्लोबल पोवर्स ऑफ रिटेलिंग 2022 इंडेक्समध्ये जगभरात वेगाने वाढणारा रिटेलर म्हणून तो सूचीबद्ध आहे. सर्वोच्च ग्लोबल रिटेलरच्या यादीत 56 वा क्रमांक राखून आहे आणि सर्वोच्च 100 मधील एकमेव भारतीय रिटेलर मानला जातो.

 

कृपया अधिक माहितीकरिता संपर्क साधा:

नम्रता शहा

Namrata.shah@ril.com

Comments