होतकरू तरुणांना उद्योजक बनवण्यासाठी केडीसीसी बँक पाठीशी: आमदार हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादन..

 होतकरू तरुणांना उद्योजक बनवण्यासाठी केडीसीसी बँक पाठीशी: आमदार हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादन



अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या मंजुरी पत्रांचे वाटप....


कोल्हापूर (कागल) ०३ : सिटी न्यूज नेटवर्क

कोल्हापूर जिल्ह्यातील होतकरू तरुणांना उद्योजक बनवण्यासाठी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक त्यांच्या पाठीशी हिमालयासारखी उभी राहील असे प्रतिपादन माजी ग्रामविकास व कामगार मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांनी केले. 


कागल येथे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने मंजुरी पत्राचे वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. आमदार मुश्रीफ भाषणात पुढे म्हणाले, तरुणांनी आता नोकरी न करता स्वतः उद्योग धंदा उभा करून तो यशस्वीपणे चालवावा यासाठी जी काय मदत लागेल ती मदत कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून करू असेही ते म्हणाले.*


केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने म्हणाले, आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांच्या मार्गदर्शनाने केडीसीसी बँकेच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या योजना तळागाळापर्यंत व गोरगरिबांच्या पर्यंत पोहोचवण्याचे काम केले आहे. यापुढेही नवनवीन उद्योजक घडवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असेही ते म्हणाले.


खालीलप्रमाणे लाभार्थ्यांची नावे :-


1 .साताप्पा विष्णू रोडे - पिराचीवाडी

2. दिगंबर सुदाम गुरव - बेलवडे बुद्रुक

3. संतोष बाळासो देवडकर - बानगे

4 नीताताई निवृत्ती पाटील - म्हाकवे


 यावेळी कागल नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष सुनील माळी, महेश पाटील बेलवळे बुद्रुक, लियाकत मकानदार, प्रवीण सोनुले आदींसह मान्यवर उपस्थित होते.

Comments