यशवंत सेनेच्यावतीने ३ डिसेंबरला कोल्हापुरात यशवंतराव होळकर जयंती महोत्सवाचे आयोजन

 यशवंत सेनेच्यावतीने ३ डिसेंबरला कोल्हापुरात यशवंतराव होळकर जयंती महोत्सवाचे आयोजन




कोल्हापूर २८ सिटी न्यूज नेटवर्क

राज्यभरातील धनगर समाज बांधवांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी यशवंत सेना कार्यरत आहे. या सेनेच्या कोल्हापूर शाखेच्यावतीने शनिवारी, ३ डिसेंबरला यशवंतराव होळकर जयंती महोत्त्तमाचे आयोजन करण्यात आले आहे. कोल्हापुरातील दसरा चौक मैदानावर हजारी नगर बांधांच्या उपस्थितीत हा मेळावा होणार असून, मेळाव्यासाठी होळकर राजघराण्याचे वंशज भूषणराजे होळकर, जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार धनंजय महाडिक, आमदार सतेज पाटील यांच्यासह जिल्ह्यातील सर्व आजी-माजी लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती यशवंत सेनेचे पश्चिम महाराष्ट्रप्रमुख राजेश तांबवे यांनी पत्रकार परिषदेत दिली.


क्रांतीसूर्य स्वर्गीय बी. के. केकरे यांनी गडदे मास्तर यांच्या साथीने यशवंत सेनेची स्थापना केली. धनगर समाज बांधवांना न्यायहका मिळवून देण्याच्या मुख्य हेतूने स्थापन झालेल्या यशवंत सेनेने १९८८ साली समाजाला एस.टी. प्रवर्गाचे आरक्षण मिळावे म्हणून संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला होता. समाजामध्ये आरक्षणाविषयी जनजागृती करत त्यावेळी भव्य मोर्चाही काढण्यात आला होता. सध्याया संघटनेचे सरसेनापती म्हणून गडदे मास्तरांचे सुपुत्र माधवभाऊ गडदे कार्यरत आहेत. तेही समाजाच्या विविध प्रश्नांसाठी सातत्याने कार्यरत आहेत, सध्या सर्वच क्षेत्रात धनगर समाज मागासलेला आहे. त्यामुळे जनजागृती करून समाजामध्ये आपले हम मिळवून देण्यासाठी ऊर्जा आणि आत्मविश्वास जागविण्याची गरज आहे. महाराजा यशवंतराव होळकर यांचा दैदिप्यमान इतिहास समाजबांधवांपुढे येऊन त्यातून समाजात जागृती व्हावी, या उद्देशाने कोल्हापुरातील दसरा चौक मैदानावर ३ डिसेंबरला जयंती महोत्सव होणार आहे. या महोत्सवासाठी राज्यभरातून समाजबांधव उपस्थित राहणार आहेत. होळकर राजघराण्याचे वंशज भूषणराजे होळकर, पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यासह या कार्यक्रमासाठी सरसेनापती माधवभाऊ गडदे, खासदार धनंजय महाडिक, आमदार हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, समरजितसिंह घाटगे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व आमदार आणि आजी-माजी मंत्री उपस्थिती लावणार आहेत. कार्यक्रमामध्ये यशवंतराव होळकर यांच्या जीवनावरील प्रेरणादायी पोवाड्याचं सादरीकरण, त्यानंतर समाजाच्या विविध समस्यांबाबत विचारमंथन आणि मार्गदर्शन होणार आहे. समाजातील कर्तृत्ववान व्यक्तींना पुरस्कार वितरण आणि गुणवंत युवा वर्गाचा सत्कार यावेळी होणार आहे. 



तसेच सायंकाळी ४ वाजता महाराजा यशवंतराव होळकर यांच्या पुतळ्याची कोल्हापूर शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. पारंपरिक धनगरी ढोलवादन, गजनृत्य, धनगरी ओवी, मुलींचं लेझीम पथक, मर्दानी खेळ अशा लवाजम्यात ही मिरवणूक निघणार असल्याचे यशवंत सेनेचे पश्चिम महाराष्ट्रप्रमुख राजेश तांबवे यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला पश्चिम महाराष्ट्र वैद्यकीय सेलचे अध्यक्ष आणि जिल्हा संपर्कप्रमुख डॉ. संदीप हजारे, पश्चिम महाराष्ट्र सचिव संजय काळे, जिल्हाध्यक्ष बापू ऊर्फ तम्मा शिरोले, जिल्हा महिला अध्यक्षा ललिता पुजारी, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत वळकुंजे, जिल्हा संघटक संदीप वळकुंजे, कागल तालुका अध्यक्ष उत्तम पाचगावे उपस्थित होते.

Comments