दैनिक राशिभविष्य

सोमवार, ७ नोव्हेंबर २०२२. 






कार्तिक शुक्ल चतुर्दशी/पौर्णिमा. शरद ऋतू. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)

राहू काळ - सकाळी ७.३० ते सकाळी ९.००

चंद्र नक्षत्र - अश्विनी 

"आज दुपारी ४.०० पर्यंत चांगला   दिवस *वैकुंठ चतुर्दशी,त्रिपुरी पौर्णिमा* आहे"

मेष:- कोर्ट कामात यश मिळेल. सौख्य लाभेल. कर्जे मंजूर होतील. महिलांकडून लाभ होतील .   
     
वृषभ:- प्रतिकूल दिवस आहे. मन शांत ठेवा. आज महत्वाची कामे नकोत. 
 
मिथुन:- मान सन्मान लाभतील. सूचक स्वप्ने पडतील. विरोधक पराभूत होतील. भौतिक सुखात कमतरता जाणवेल.

कर्क:- अनुकूल दिवस आहे. मौल्यवान खरेदी होईल. वाहन सुख मिळेल. दागिने विकत घ्याल.
 
सिंह:- धाडसी निर्णय घ्याल. त्याचा लाभ होईल. गुंतवणूक लाभदायक ठरेल.
  
कन्या:- आर्थिक लाभ होतील. मन प्रसन्न राहील. घरात तुमच्या शब्दाला मान मिळेल.
 
तुळ:- नात्यातून लाभ होईल. लेखकाना यश मिळेल. विवाह इच्छुकांना शुभ समाचार समजतील.  
 
वृश्चिक:- उत्तम आर्थिक लाभ होतील. मनासारखी कामे होतील. महत्वाचे करार आज पूर्ण करा.

धनु:- सौख्य लाभेल. मन प्रसन्न राहील. आनंद घ्या. छंद जोपासले जातील.
 
मकर:- धावपळ वाढेल मात्र कामे मार्गी लागतील. कॉमर्स मधील मंडळींना चांगला कालावधीआहे. कौटुंबिक सुख लाभेल. 
 
कुंभ:- आत्यंतिक सुखाची अनुभूती मिळेल. मनासारखी कामे होतील. मन प्रसन्न राहील.
 
मीन:- कलाकारांना यश मिळेल. व्यवसायात वाढ होईल. संधी सोडू नका. भरपूर काम करा.   


(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी -  8087520521)

Comments