संविधान दिनानिमित्त 'आप'च्या वतीने संविधान वाचन
संविधानाची मूल्ये घरोघरी पोहचवण्याचा निर्धार
कोल्हापूर २६ सिटी न्यूज नेटवर्क
संविधान दिनानिमित्त आम आदमी पार्टीच्या वतीने बिंदू चौक येथे संविधान वाचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी पक्षाच्या वतीने संविधानाच्या उद्देशिकेचे सार्वजनिक वाचन करण्यात आले.
भारतीय संविधानास अभिप्रेत असलेल्या समता, बंधुता व स्वातंत्र्याची मूल्ये घरोघरी पोहचवण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
कार्यक्रमास जिल्हाध्यक्ष निलेश रेडेकर, उत्तम पाटील, अभिजित कांबळे, संजय साळोखे, विजय हेगडे, दुष्यन्त माने, ऍड. चंद्रकांत पाटील, ऍड. रणजित कवाळे, भाग्यवंत डाफळे, मयूर भोसले, रवींद्र राऊत, अमरसिंह दळवी, सचिन वणीरे, समीर लतीफ, आदी उपस्थित होते.
Comments
Post a Comment