महाराष्ट्रातील ध्येयवेड्या सेवावर्तिना यावर्षीपासून देण्यात येणार 'सावली पुरस्कार'
कोल्हापूर 23 सिटी न्यूज नेटवर्क
कोल्हापूरात अंथरुळला खिळलेल्या रुग्णाच्या सेवेत अविरतपणे कार्यरत असलेल्या यंदा १८ वर्ष पूर्ण झाली तर कोल्हापूरकरांच्या प्रचंड पाठींब्यावर उभ्या राहिलेल्या सावलीच्या नूतन इमारतीला नोव्हेंबरमध्ये ५ वर्ष पूर्ण होत आहेत.
यानिमिताने सावली व्यवस्थापनाने यावर्षीपासून सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामना "सावली पुरस्कार "देऊन सन्मानित करण्याचा संकल्प केला आहे. या पुरस्काराचे पहिले मानकरी म्हणून सेवा संकल्प प्रतिष्ठान ह्या पळसखेड सपकाळ, ता. चिखली, जि. बुलढाणा येथील डॉ. नंदकुमार आणि आरती पालवे या दांपत्याची निवड करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. डॉक्टर पळसखेड सपकाळ या लहानशा गावात त्यांच्या संस्थेमध्ये निराश्रीत वासर अशा मनोरुग्ण एड्स ग्रस्त आजी-आजोबांचा सांभाळ करतात. शक्य असेल तर त्या रुग्णांना त्यांच्या घरी पाठवण्याचा प्रयत्न केला जातो. जे काम करू शकतात अशा व्यक्तींना काही ना काही काम देऊन त्यांचे पुनर्वसन करण्याचा प्रयत्न केला जातो. जे अगदीच विकलांग आहेत त्यांना मात्र शेवटपर्यंत मायेने सांभाळले जाते.
त्याचबरोबर गेल्या पाच वर्षापासून जिल्ह्यामध्ये आढळणाऱ्या बेवारस मृतदेहांवर सन्मानाने अंत्यसंस्कार करण्याचे कामही संस्था करत आहे.
अगदी तरुणपणामध्ये ऐषआरामात आयुष्य जगणे शक्य असताना ह्या जोडप्याने हा खडतर मार्ग अवलंबला आहे. आज संस्थेमध्ये २०० पेक्षा जास्त प्रवेशीत सेवा घेत आहेत तर १५० पेक्षा जास्त प्रवेशतांना त्यांच्या स्वगृही पाठवण्यात संस्था यशस्वी झाली आहे.
पालवे दांपत्याचा आपण यानिमित्ताने समस्त कोल्हापूरकरांच्या वतीने भव्य नागरी सत्कार करणार आहोत. या सत्कारामध्ये सावली परिवाराबरोबरच कोल्हापूर मेडिकल असोसिएशन, कोल्हापूर प्रेस क्लब, हॉटेलमालक संघ, कोल्हापूर, म्युझीक असोसिएशन ऑफ कोल्हापूर, हृदयस्पर्श प्रतिष्ठान, कोल्हापूर पुरोहित संप.स्वामी विवेकानंद संस्था, संमिया प्रतिष्ठान, लोकराजा प्रतिष्ठान, प्रेरणा बहुउदेशीय संस्था (आशाअसोसिएशन) या मान्यवर संस्था सामिल होत आहेत,
कोल्हापूरच्या सामाजिक चळवळ, सांस्कृतिक जडणघडण यामध्ये सातत्याने अग्रणी असणारे ज्ये पत्रकार श्री उदय कुलकर्णी यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान केला जाईल.
विशेष म्हणजे, डॉ. पालवे यांच्या कार्याने प्ररीत होऊन सावली संस्थेच्या सर्व कर्मचान्यांनी वर्गणी जमवून सेवा संकल्प प्रकल्पासाठी ५१ हजारांचा निधी जमवला आहे. तोही वानिमिताने पालवे दांपत्याला प्रदान करण्यात येईल. कोल्हापूरची प्रसिद्ध संवादक सोनाली नवांगूळ डॉक्टर दांपत्यांची प्रगट मुलाखत घेऊन त्यांचा प्रवास उलगुडून दाखवणार आहे.
या भव्य नागरी सत्काराला समस्त कोल्हापूरकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे सावलीचे किशोर देशपांडे यांनी आवाहन केले. यावेळी हृदय स्पर्शचे पद्माकर कापसे, संचीन शानबाग आदी उपस्थित होते.

Comments
Post a Comment