मा.राज ठाकरे यांचा २९ व ३० नोव्हेंबरला कोल्हापूर दौरा

 मा.राज ठाकरे यांचा २९ व ३० नोव्हेंबरला कोल्हापूर दौरा




कोल्हापूर २७ सिटी न्यूज नेटवर्क

हिंदुजननायक मा. राज ठाकरे यांच्या २९ व ३० नोव्हेंबर २०२२ रोजीच्या कोल्हापूर जिल्हा दौऱ्याची रुपरेषा मांडण्यासाठी मनसे कोल्हापूरतर्फे प्रेस क्लब कार्यालयामध्ये पत्रकार परिषदचे आयोजन करणेत आले होते.


यावेळी शहर अध्यक्ष राजू दिडोले यांनी विशद केले की, राजसाहेब मंगळवार दि. २९ नोव्हेंबर २०२२ रोजी तावडे हॉटेल मार्ग शहरात पदार्पण करताच दु. १.००वा ताराराणी चौक येथे भव्यदिव्य स्वागत करणेत येणार आहे.


याप्रसंगी ढोल ताशा, मर्दानी खेळ, लेझीम, झाजपथक वादयवृंदाच्या गजरात संपूर्ण जिल्हयाच्या वतीने पुष्पहार घालून स्वागत करणेत येईल.


जिल्हासचिव प्रसाद पाटील यांनी सांगितले २९ नोव्हेंबर २०२२ रोजी दु.४.०० वाजता शासकीय विश्रागृहामधील राजर्षि शाहू सभागृहामध्ये लोकसभा मतदारसंघानिहाय दोन बैठका संपर्कप्रमुख जयराजजी लांडगे साहेब यांचे अध्यक्षते खाली राजसाहेबांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडतील. या बैठका साठी अधिकृत पदाधिकाऱ्यांना मुंबईहून पासेस वितरीत करणेत आलेले असून या बैठकीत राजसाहेब स्वतः सर्व पदाधिकान्यांशी स्वतंत्रपणे चर्चा करुन आगामी राजकीय वाटचालीचे नियोजन करतील. तद्नंतर प्रसारमाध्यामांशी सुसंवाद करणेत येईल.



परिवहन जिल्हाध्यक्ष विजय करजगार यांनी बुधवार दि. ३० नोव्हेंबर २०२२ रोजी चे नियोजन सांगताना स. ९.०० वाजता प्रथम राजर्षि शाहू समाधीस्थळाचे दर्शन घेतील.


तद्नंतर सकाळी ९.१५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करतील. सकाळी ९.३० वाजता अंबाबाईचे दर्शन घेऊन कोकण दौऱ्यासाठी रवाना होतील.


ज्येष्ठ नेते पुंडलीकभाऊ जाधव यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना एकत्रित घेऊन प्रचंड उत्साहात राजसाहेबांचे स्वागत करण्याचा मनोदय व्यक्त केला.


सदरहू पत्रकार परिषदेस शहर अध्यक्ष राजू दिंडोले, जेष्ठ नेत पुंडलिक जाधव, जिल्हासचिव प्रसाद पाटील, परिवहन जिल्हाध्यक्ष विजय करजगार, सहकारसेना संघटक निलेश लाड, जनहित संघटक रत्नदिप चोपडे आदि प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. असे पत्रक जिल्हा सचिव प्रसाद पाटील यांनी प्रसिध्दीस दिले.

Comments