जिओ ट्रू 5G केरळच्या कोची शहर आणि गुरुवायूर मंदिरात लाँच
• मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्याकडून उद्घाटन
• त्रिवेंद्रम, कोझिकोड, त्रिशूर आणि मलप्पुरम जानेवारी 2023 पर्यंत जिओ 5G सेवेशी जोडले जातील
• वापरकर्त्यांना 'जिओ वेलकम ऑफर' अंतर्गत 1Gbps+ स्पीडसह अमर्यादित 5G डेटा मिळेल
कोची, 20 सिटी न्यूज नेटवर्क
जिओने कोची शहर आणि केरळमधील गुरुवायूर मंदिर संकुलात तिची ट्रू 5G सेवा आणि 5G वाय-फाय सेवा सुरू केली आहे. मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी या सेवांचे उद्घाटन केले. कोची येथे झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री त्रिवेंद्रमशी डिजिटल पद्धतीने जोडले गेले.
देशातील सर्वोत्कृष्ट स्टार्ट-अप हब म्हणून ओळखले जाणारे कोची शहर आशियातील सर्वोत्तम स्टार्ट-अप इकोसिस्टमच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आहे. 5G च्या अल्ट्रा हाय स्पीडच्या आधारे केरळमधील स्टार्टअप्स उंच उड्डाण करू शकतील अशी अपेक्षा आहे.
गुरुवायूर मंदिर हे भारताच्या धार्मिक पर्यटन नकाशावर जिओच्या ट्रू 5G नेटवर्कशी जोडलेले चौथे मोठे धार्मिक स्थळ आहे. यापूर्वी, उज्जैनचे श्री महाकाल मंदिर परिसर आणि श्री महाकाल लोक कॉरिडॉर, राजस्थान-नाथद्वाराचे श्रीनाथ मंदिर परिसर आणि उत्तर प्रदेशचे वाराणसी शहर जिओच्या नेटवर्कशी जोडले गेले आहेत.
जिओ ट्रू 5G लाँच प्रसंगी बोलताना, *केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन* म्हणाले, "जिओ चे लाँचिंग केरळ आणि तेथील लोकांसाठी मैलाचा दगड ठरेल. राज्यातील सामान्य लोकांना याचा फायदा होईल. जिओ ट्रू 5G नेटवर्क तयार करण्यासाठी जिओ ने केरळमध्ये 6,000 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केली आहे. ही गुंतवणूक जिओ ची आमच्या राज्याप्रती असलेली वचनबद्धता दर्शवते. जिओ जानेवारी 2023 पर्यंत त्रिवेंद्रम, कोझिकोड, त्रिशूर, मलप्पुरम आणि डिसेंबर 2023 पर्यंत केरळमध्ये 5G नेटवर्क तयार करण्यासाठी वचनबद्ध आहे. प्रत्येक तहसील आणि तालुक्यात पोहोचेल.
ते पुढे म्हणाले की, “प्रत्येक प्रदेशाला आणि प्रत्येक व्यक्तीला जिओ ट्रू 5G चा लाभ मिळेल, रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील, सामान्य लोक आणि सरकार एकमेकांशी रिअल टाइममध्ये कनेक्ट होऊ शकतील आणि सरकारी योजनांचे फायदे मिळतील. शेवटच्या उपेक्षित व्यक्तीपर्यंत पोहोचेल तसेच सरकारी कामांनाही गती येईल.
जिओ ने 5G चे फायदे दर्शविण्यासाठी 'जिओ कम्युनिटी क्लिनिक मेडीकल किट ', जिओ ग्लास सोबत AR-VR डिव्हाइस देखील प्रदर्शित केले.
या प्रसंगी बोलताना जिओच्या प्रवक्त्याने सांगितले की, “आम्ही केरळमधील कोची आणि गुरुवायूर मंदिरात जिओ ट्रू 5G सेवा सुरू करण्यास उत्सुक आहोत. लवकरच संपूर्ण केरळ जिओ ट्रू 5G नेटवर्कशी जोडले जाईल. केरळमध्ये 5G नेटवर्क लॉन्च करणारी जिओ ही पहिली ऑपरेटर आहे. प्रत्येक भारतीयाला ट्रू-5G उपलब्ध करून देण्यासाठी जिओ अभियंते चोवीस तास काम करत आहेत. केरळचे डिजिटायझेशन आणि ते पुढे नेण्यात पूर्ण सहकार्य केल्याबद्दल आम्ही मुख्यमंत्री आणि केरळ सरकारचे आभारी आहोत.”
जिओ वेलकम ऑफर अंतर्गत, जिओ वापरकर्ते 20 डिसेंबरपासून कोची आणि गुरुवायूरमध्ये 1Gbps+ स्पीड आणि अमर्यादित डेटाचा आनंद घेऊ शकतील.
जिओ चे 5G नेटवर्क किती वेगाने प्रगती करत आहे हे सरकारने लोकसभेत दिलेल्या आकडेवारीवरून दिसून येते. जिओ ने 5G चे बेस स्टेशन त्याच्या प्रतिस्पर्धी एअरटेल पेक्षा 5 पट स्थापित केले आहे. सरकारी आकडेवारीनुसार, 26 नोव्हेंबरपर्यंत देशातील 14 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 5G साठी 20,980 बेस स्टेशन तयार करण्यात आले होते. यामध्ये रिलायन्स जिओच्या 17,687 आणि एअरटेलच्या 3,293 बेस स्टेशनचा समावेश आहे. वी ने अजून सुरुवात केलेली नाही.

Comments
Post a Comment