भालचंद्र चिकोडे ग्रंथालयामध्ये रक्तदान शिबिरास उस्फुर्त प्रतिसाद : 762 रक्तदात्यांनी केले रक्तदान
कोल्हापूर २५ सिटी न्यूज नेटवर्क
देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्य आज भालचंद्र चिकोडे ग्रंथालयाच्यावतीने घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरास रक्तदात्यांनी उस्फुर्त प्रतिसाद लाभला. या रक्तदान शिबिरास 762 रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक कार्यात सहभाग नोंदवला.
जरगनगर येथे भालचंद्र चिकोडे ग्रंथालयामध्ये महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंत्री मा.नाम.चंद्रकांतदादा पाटील यांच्याहस्ते श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून रक्तदान शिबिरास सुरवात करण्यात आली.
ग्रंथालयाचे अध्यक्ष राहुल चिकोडे यांनी वर्षभर होणाऱ्या सामाजिक कार्याची माहिती देत रक्तदानाचे महत्व आणि रक्तदानाची सामाजिक गरज उपस्थितांना सांगितली. त्याचबरोबर ग्रंथालयाच्या माध्यमातून होणाऱ्या उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले.
याप्रसंगी आपल्या मनोगतामध्ये नाम.चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, अटलजींनी आपले संपूर्ण आयुष्य देशाची संस्कृती, संवर्धन आणि विकास होण्यासाठी समर्पित केले. देशाच्या संस्कृतीमध्ये विकास आहे. सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया अशा व्यापक विचाराची आपली संस्कृती आहे. अशा विचारामध्ये विकास असून तो विचार अटलजी जगले त्यामुळे पक्ष वाढीबरोबर संस्कृती संवर्धनाचे मोठे कार्य त्यांच्यामाध्यमातून झाले आहे. त्यांच्या कार्यकालात देशाचा प्रचंड विकास झाला काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत संपूर्ण देश हायवेच्या निर्मिती मधून जोडला गेला. देशाबद्दल अभिमान कसा जागृत करायचा हे अटलजींच्या माध्यमातून समजते. त्यांच्या काळात सुरु झालेले काही जागतिक विषय मोदिजी पूर्ण करत आहेत.अविकसित देशांना अनेक सेवा उपलब्ध करून देण्याचे करण्याचे कार्य सुरु आहे. अटलजींनी एका अर्थाने एका नव्या युगाची सुरवात केली त्यांचे स्वप्न मोदीजी पूर्ण करत आहेत. त्यांच्या वाढदिवसाला असे कार्यक्रम करणे अतिशय संयुक्तिक गोष्ट आहे. कोवीडच्या काळात रक्तदान शिबिरांचे महत्व प्रत्येकाला जाणवले आहे. जगामध्ये सर्व गोष्टीची निम्रीती करता येते परंतु अद्याप रक्त निर्मिती करता आलेली नाही. त्यामुळे सेवा हि धर्म म्हणून होणारे असे उपक्रम सातत्याने करत असल्याबद्दल ग्रंथालयाच्या उपक्रमांना शुभेच्छा दिल्या.
आज दिवसभरामध्ये झालेल्या रक्तदान शिबिरात जवळपास 250 हुन जास्त महिला व पुरुष यांना हिमोग्लोबीनच्या कमतरतेमुळे रक्तदान करता आले नाही. त्यामुळे सातत्याने हिमोग्लोबिन तपासण्याचे कॅम्प घेऊन योग्य त्या घटकांचा आपल्या आहारामध्ये समावेश करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन
ग्रंथालयाचे अध्यक्ष राहूल चिकोडे यांनी सांगितले.
या रक्तदान शिबिरासाठी अर्पण ब्लड बँकेचे बाबासाहेब आगाव, माधव ढवळीकर, डॉक्टर प्रकाश गाडवे, डॉ श्रीकांत नलवडे, डॉ राजेंद्र चिंचणीकर, रवी पाटील, सीपीआर रक्तपेढीचे डॉ प्रतीक शिंदे, रणजित केसरे, जयवंत कदम, प्रेमचंद्र कमलाकर यांच्यासह सहकारी यांनी रक्तदात्यांना योग्य मार्गदर्शन केले.
आजच्या रक्तदान शिबिरास धनंजय महाडिक, अमल महाडिक, प्रकाश आवाडे, समरजीतसिंह घाटगे, महेश जाधव, नाना कदम, राजेश क्षीरसागर, मिलिंद धोंड,
कृष्णराज महाडिक, वंदूरे पाटील, श्रीधर कुलकर्णी, अजिंक्य चव्हाण, संतोष शानबाग, श्री नाळे, अशोक देसाई, आशिष ढवळे, नरेश चंदवाणी, प्रभाकर हेरवाडे, भरत खराटे, योगेश पाटील, विजयसिंह खाडे-पाटील, सचिन पाडळकर, आजम जमादार, संग्राम निकम, प्रमोद पाटील, शंतनू सावंत, राहुल भोसले, अमोल माने, बाबा शिंदे, सन्मती मिरजे, अनिल यादव, सागर बगाडे, दिलीप सावंत, श्रीकांत पोतनीस, डॉ अश्विनी माळकर, संजय सावंत, राजू मोरे, हेमंत आराध्ये, अमोल पालोजी, माणिक पाटील चुयेकर, मंगला निप्पानीकर, रविंद्र मुतगी, आशिष कपडेकर, सुधीर देसाई यांच्यासह भाजपा पदाधिकारी, विविध संघटनांचे पदाधिकारी-सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आजचे रक्तदान शिबीर यशस्वी होण्यासाठी सचिन साळोखे, जयदीप मोरे, योगेश चिकोडे, सुमित पाटील, श्रीधर नलवडे, कृष्णात आतवाडकर, प्रीतम यादव, विजय आगरवाल, विवेक कुलकर्णी, अतुल चव्हाण, ओंकार खराडे, सिद्धू पिसे, सागर पाटील, भार्गव परांजपे, प्रथमेश पाटील, शंतनू मोहिते, सिद्धार्थ तोरस्कर यांनी परिश्रम घेतले.
Comments
Post a Comment