दैनिक राशिभविष्य

 शनिवार, ३१ डिसेंम्बर २०२२






पौष शुक्ल नवमी, हेमंत ऋतू. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)


राहुकाळ - सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०


"आज चांगला दिवस आहे" 


चंद्र नक्षत्र - रेवती.


मेष:- खर्चात वाढ करणारा दिवस आहे. धावपळ वाढेल. कामानिमित्त प्रवास घडतील. प्रतिष्ठा साठी खर्च कराल. दिखाऊपणा टाळा.   

     

वृषभ:- उत्तम लाभाचा दिवस आहे. संवाद कौशल्य कामास येईल. प्रवासात लाभ होतील. सरकारी कामे मार्गी लागतील. सन्मान प्राप्त होतील. यश मिळेल.  

 

मिथुन:- कामानिमित्त प्रवास घडतील. नवीन ओळखी होतील. बोलक्या स्वभावाचा फायदा होईल. कर्जे मंजूर होतील येणी वसूल होतील. वरिष्ठ खुश होतील.


कर्क:- दूरचे प्रवास घडतील. किंवा तसे बेत आखले जातील. उच्च शिक्षणात यश मिळेल. दूरचे नातेवाईक भेटतील. जेष्ठ व्यक्तींसाठी अनुकूल दिवस आहे.  

 

सिंह:- धनलाभ होईल. शत्रू पराभूत होतील. प्रवास घडेल. वाहने काळजी पूर्वक चालवा. खर्चात मात्र वाढ होणार आहे. कागदपत्रे काळजीपूर्वक तपासा.

  

कन्या:-  गैरसमज होण्याचा दिवस आहे. अर्थचा अनर्थ होऊ देऊ नका. जोडीदाराशी संवाद साधा. विवाह इच्छुकांना खुशखबर मिळेल. 

 

तुळ:- उत्तम आर्थिक लाभाचा दिवस आहे. अधिकाराचा योग्य उपयोग कराल. महत्वाचे करार आज पूर्ण करा. अधिकार आणि धार्मिक कर्तव्य यांचे अनोखे मिश्रण अनुभवाला येईल.

 

वृश्चिक:- तुमची अफाट कार्यक्षमता कामास येईल. प्रश्न मार्गी लागतील. सौख्य लाभेल. प्रगती होईल. वाहनसुख मिळेल. छोटे प्रवास घडतील.


धनु:- शेतीतून लाभ होतील. धातूंशी संबंधित व्यवसायात यश मिळेल. छंद जोपासाल. मन आनंदी राहील. घरात काही बदल कराल. वास्तू संबंधित कामे मार्गी लागतील.

 

मकर:- अत्यंत सुखाचा दिवस आहे. मन प्रसन्न राहील. मनासारख्या घटना घडतील. वरिष्ठ खुश होतील. शब्दाला मान मिळेल. कुटुंबास वेळ द्याल.

 

कुंभ:- तुमच्या मिश्किल स्वभावाचा प्रत्यय येईल. विक्री व्यवसायात यश मिळेल. मन मोकळे कराल. आर्थिक आवक चांगली राहील मात्र खर्च देखील होणार आहे. कला क्षेत्रात यश मिळेल.

 

मीन:-  आर्थिक लाभ होतील. भ्रमंती घडेल मात्र त्यातून फायदा होणार आहे.  प्रतिष्टेपायी खर्च कराल.

 


(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी -  8087520521)

Comments