दैनिक राशिभविष्य

 रविवार, २५ डिसेंम्बर २०२२





पौष शुक्ल द्वितीया/तृतीया, हेमंत ऋतू. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)


राहुकाळ - दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.०० 


आज चंद्र 'उत्तराषाढा' नक्षत्रात आहे. क्षय दिन आहे.


मेष:- कामे मार्गी लागतील. मान सन्मान मिळतील. प्रतिष्ठा वाढेल. यशस्वी दिवस आहे. सौख्य लाभेल. मन प्रसन्न राहील.   

     

वृषभ:- प्रवास घडतील. यश मिळेल. व्यवसायिक अंदाज अचूक ठरतील. आप्तांकडून मदत मिळेल. आरोग्य सुधारेल.

 

मिथुन:- आज आरोग्य सांभाळणे अत्यंत आवश्यक आहे. विश्रांती घ्या. अंगदुखीचा त्रास संभवतो. अपमानाचे प्रसंग येऊ शकतात.  


कर्क:- प्रसिद्धी मिळेल. प्रवासात ओळखी होतील. मार्ग सापडेल. विवाह इच्छुकांना खुश खबर मिळेल. उत्साह वाढेल.

 

सिंह:- उत्तम आर्थिक लाभ होतील. शत्रू पराभूत होतील. स्पर्धेत मोठे यश मिळेल. सरकारी कायदे मात्र कसोशीने पाळा. व्यायामाची गरज जाणवेल.

  

कन्या:- वादविवादात जिंकाल. खर्चात वाढ होणार आहे. विनाकारण वाद विवाद टाळा. कामात अडथळे येतील. 

 

तुळ:- मन प्रसन्न राहील. गृहसौख्य लाभेल. विश्रांतीची गरज भासेल. नातेवाईक भेटतील. महत्वाची चर्चा होईल.

 

वृश्चिक:- आत्यंतिक सुखाचा दिवस आहे. शुभ घटना घडतील. उत्साह वाढेल. प्रसन्न वाटेल. 


धनु:- घरात आनंदी वातावरण निर्माण होईल. उपासना लाभदायक ठरेल. खर्चात वाढ होईल. कलाकारांना यश मिळेल.

 

मकर:- कामात अडचणी निर्माण होऊ शकतात. काही अनुकूल घटना घडतील. संथपणे काम होईल.

 

कुंभ:- यश मिळेल. खर्चात टाकणारा दिवस आहे. मन अस्वस्थ राहील. संमिश्र दिवस आहे. 

 

मीन:- उत्तम आर्थिक लाभाचा दिवस आहे. व्यवसायात भरगच्च वाढ होईल. वेळ दवडू नका. उत्साह वाढेल.



(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी -  8087520521.

Comments