'उमेद' सारखी चळवळ गावोगावी निर्माण व्हावी-माजी परराष्ट्र सचिव ज्ञानेश्वर मुळे
कोपार्डे (ता. करवीर) येथील उमेद मायेच्या घराचे पहिल्या टप्प्याचे उद्घाटन
कोल्हापूर २६ सिटी न्यूज नेटवर्क
छत्रपती शाहू महाराजांनी जे स्वप्न बाळगले होते त्या विचारांनी प्रेरित होऊन तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात मांडलेल्या स्वातंत्र्य, समता, न्याय या त्रीसूत्री नुसार वंचित घटकासाठी साठी तळमळीने उमेद सामाजिक संघटना काम करत आहे.'उमेद' सारखी चळवळ गावोगावी निर्माण व्हावी.या संघटनेत काम करणारे सर्व मंडळी संतांचे विचार घेऊन जाणारे वारकरी असल्याचे गौरवोद्गार माजी परराष्ट्र सचिव ज्ञानेश्वर मुळे यांनी काढले.
ते कोपार्डे(ता. करवीर) येथे उमेद या सामाजिक संघटनेच्या भव्यदिव्य मायेच्या घराचे उद्घाटन कार्यक्रम वेळी अध्यक्षीय भाषणात बोलत होते .ज्ञानेश्वर मुळे व मान्यवरांच्या हस्ते या वास्तूचे उद्घाटन झाले. यावेळी आय आर एफ च्या पदाधिकारी साधना शंकर, उद्योगपती अमर शेळके,बिपिन जिरगे, प्रकाश गाताडे व उमेश टीम उपस्थितीत होती.
कोरोनाच्या काळात आत्मनिर्भर असणाऱ्या भारतातील ८० कोटी लोकांना मोफत अन्नाची गरज होती. देशात २० कोटी लोक भटके आहेत. त्यांना आधार कार्ड मिळणे कठीण आहे. आधार कार्ड नाही शासनाची मदत नाही. अशा परिस्थितीत दिव्यांग, परितक्त महिला,अनाथ मुले, ऊसतोड मजूर अशा घटकातील जनतेला अशा मायेच्या घराची गरज आहे. हे उमेद संघटनेने मिळवून दिले आहे. या चळवळीत लोकप्रतिनिधींना सहभागी करून घ्या असा सल्लाही दिला.
यावेळी लेखिका साधना शंकर म्हणाल्या तंत्रज्ञानाने आपली नाती दुरावत चालली आहेत. लोकसहभाग व लोकचळवळ सामाजिक कामाला गती देते असे सांगितले.
विपीन जिरगे,अमर शेळके यांनी मनोगते व्यक्त केली. प्रकाश गाताडे यांनी संघटनेच्या कामाचा अहवाल सादर केला तर नवीनचंद्र सनगर यांनी आभार मानले.
Comments
Post a Comment