२० ते २३जानेवारी २०२३ रोजी इंडियन डेअरी फेस्टिवल २०२३ चे आयोजन

 २० ते २३जानेवारी २०२३ रोजी इंडियन डेअरी फेस्टिवल २०२३ चे आयोजन



कोल्हापूर ०१ सिटी न्यूज नेटवर्क

कोल्हापूर इंडियन डेअरी असोसिएशन आणि नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड यांच्या सहकायनि कोल्हापूर येथे दिनांक २० ते २२ जानेवारी २०२३ रोजी इंडियन डेअरी फेस्टिवल २०२३ चे आयोजन केले आहे.

"नांदी.. नव्या धवल क्रांतीची" हे घोषवाक्य घेऊन आणि सद्यस्थितीतील पशुधन आणि डेअरी क्षेत्रातील उपलब्ध पायाभूत सुविधांच्या बळावर अधिक आणि गुणवत्तापूर्ण दूध उत्पादन, संकलन आणि प्रक्रियेत आधुनिक तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर आणि यातून फायदेशीर पशुपालन आणि डेअरी उद्योग हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून फेस्टिवल मध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा या राज्यांतील सहकारी आणि खासगी दूध संघ, देशातील डेअरी उद्योगातील सर्व सहयोगी घटक सहभागी होणार आहेत. 

तीन दिवस चालणाऱ्या या फेस्टिवल मध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कोल्हापूर विभागात प्रथमच अशा प्रकारच्या फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे.

देशातील दुग्ध व्यवसायासमोरील संधी, आव्हाने, दूध उत्पादनात वाढ आणि २०३० पर्यंतची ध्येयधोरणे ठरवण्यासाठी या क्षेत्रातील तज्ञ, सर्व घटक आणि शासन व्यवस्था यांना एकत्रित घेऊन हॉटेल सयाजी येथे दूध परिषदेचे आयोजन केले आहे. या सोबत दूध उत्पादक शेतकन्यापासून, दूध संस्था, दूध प्रक्रिया संघ आणि ग्राहक या सर्व घटकांना लागणारी आवश्यक माहिती, तंत्रज्ञान एकाच छताखाली मिळवून देण्यासाठी शाहूपुरी जिमखाना मैदानावर भव्य डेअरी एक्स्पो होणार आहे. या उद्योगात काम करणाऱ्या आणि हा व्यवसाय करू इच्छिणाऱ्या सर्वांना पशुसंवर्धन आणि डेअरी उद्योगाची माहिती करून देणारे एक पुस्तक प्रकाशित करण्यात येणार आहे. या सर्व उपक्रमांचे एका व्यापक चळवळीत रुपांतर करण्यासाठी विविध माध्यमातून याचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत. यासाठी पुढील एका वर्षातील उपक्रमांचे नियोजन करण्यात येणार आहे. नव्या पिढीचा सहभाग या क्षेत्रात वाढवण्यासाठी या उद्योगाचे अर्थकारण, तंत्र, महत्व आणि मार्गदर्शन समजून देण्यासोबत सकल राष्ट्रीय उत्पन्नामध्ये डेअरी उद्योगाचा वाटा वाढवण्याच्या दृष्टीने सुरु असलेल्या प्रयत्नांना गती देण्याच्या दृष्टीने या फेस्टिवलचे महत्व अनन्यसाधारण आहे.

१९७० ते १९९६ पर्यंत एकूण २६ वर्षे कार्यरत असणाऱ्या ऑपरेशन फ्लडच्या माध्यमातून भारत जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश बनला. डेअरी हा आता फक्त कृषी पूरक उद्योग राहिला नाही. या उद्योगाचे एक स्वतंत्र स्थान निर्माण झाले आहे. जी.डी.पी. मधील त्याच्या योगदानातून या क्षेत्राने ते सिद्ध केले आहे. आज महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यातील ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था दूध व्यवसायावर अवलंबून आहे. सहकाराची कास धरत महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात जिल्हा आणि तालुका दूध संघ निर्माण झाले. अलीकडच्या काळात पशुसंवर्धन आणि दूध प्रक्रिया उद्योगात खासगी क्षेत्राने मोठ्या प्रमाणात केलेल्या भांडवली गुंतवणूक, नवं तंत्रज्ञान, आधुनिक यंत्र सामुग्री याच्या जोरावर बन्याच खासगी संस्थांनी बाजारपेठेतील आपला वाटा वाढवण्यास सुरवात केली. यामुळे डेअरी उद्योगाचा विस्तार झाला. या सर्व गोष्टी सकारात्मक दिसत असल्या तरी नैसर्गिक संकटे, जागतिक स्पर्धा, धोरणे, व्यावसायिक दृष्टिकोन आणि भविष्यकालीन नियोजनाविषयी अभाव, या सर्वामुळे अमर्याद संधी असणाऱ्या या व्यवसायासमोर नवनवीन आव्हाने देखील निर्माण झाली आहेत. काळानुसार बदलणारी व्यावसायिक समीकरणे जुळवण्यात त्यातील बहुतांश दूध संघाना अपयश आले. सद्यस्थितीला काही मोजके दूध संघ वगळता अनेक सहकारी दूध संघांची अवस्था बिकट बनली आहे.

सदर इंडियन डेअरी फेस्टिवल हे एका नव्या धवल क्रांतीचे पूरक ठरेल असा आशावाद चेतन नरके यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. यावेळी अरुण नरके, स्पूर्तीचे किरीट मेहता चितळे डेअरी - गिरीश चितळे वारणा डेअरी - अनिल थोरात डेअरी - आबासाहेब थोरात विराज डेअरी - विशाल पाटील गोविंद डेअरी - संजीवराजे निंबाळकर, राजारामबापू दूध संघ - नेताजीराव पाटील, कुटवळ डेअरी - प्रकाश कुटवळ

थोपटे डेअरी - नितीन थोपटे

समाधान डेअरी - राहुल थोरात

विमल डेअरी - सुभाष मयेकर

दत्त इंडिया डेअरी - सबर्जित आहुजा

गोकुळ दूध - चेतन नरके

मयुरेश टेक्नोलॉजी - संजीव गोखले

यांच्यासह विविध डेअरीचे अधिकारी

आदी मान्यवर उपस्थित होते 

Comments