असल्या आंदोलनाचा प्रशासनाला ताप

असल्या आंदोलनाचा प्रशासनाला  ताप 



कोल्हापूर २५ : (वार्ताहर)आजकाल करवीर नगरीची ओळख विशिष्ट वर्गामुळे वेगळी होत आहे. आजकाल कोणीही उठतो आणि गुंतवणुकीच्या नावाखाली एखादी कंपनी काढतो आणि विविध अमिष दाखवतो अशा अमिषांना एक ठराविक वर्ग नेहमीप्रमाणे बळी पडतो. या कंपन्यांची भूक भागली की कंपनी बंद करायची आणि गुंतवणूकदारना कात्रजचा घाट दाखवायचा. हे पेव अगदी संचयनी पासून काल परवाच्या एस् ट्रेडर्स पर्यंत सुरूच आहे पण याबाबत जनजागृती करणारे एकही आंदोलन कोणी करत नाही. पण शहरात सुरू असलेल्या वेगवगळ्या अवैध धंद्या विरुद्ध काही लोक जाणीवपूर्वक आंदोलनाचा फार्स करीत आहेत.  असले अवैध धंदे शहराबाहेर राजरोस सुरू आहे . असे आंदोलनं फक्त शहरातच का? यात नेमका अर्थ कारण काय आहे याचं कोड जनतेबरोबर तपास यंत्रणेला पडलेले आहे . 

या आंदोलनात एका पक्षाच्या युवा नेत्याने कोल्हापूर पोलीस प्रशासनाला वेठीस धरले आहे.रस्ता रोको करून सर्वसामान्य जनता वेठीस धरुन काय मिळणार.जनतेतून अशा कमिशन च्या आंदोलनाला कोणताही सहभाग  मिळत नसतो.यामुळे पक्षाची प्रतिमा मलीन होत असते.जिल्ह्यातील इतर भागात मग अवैध धंदे सुरू नाहीत का त्यांची कोणाची नावे नाहीत का?असा सवाल उपस्थित होत आहे.रोज कोणीही उठतो आणि निवेदन देत सुटतो परंतु त्यामागील उद्देश सर्वांना माहीत असतो.सदर  आंदोलनांत पोलीस प्रशासन विनाकारण वेठीस धरल्याने तीव्र नाराजी वाढताना दिसत आहे.

 या कंपन्यां विरुद्ध कारवाई करायची का असल्या आंदोलन साठी वेळ खर्ची करायचा यांच्यातच तपास यंत्रणेचा वेळ जात आहे . तरी अशी आंदोलनात काही आर्थिक गणिते आहेत का याचाच तपास पहिला केला पाहिजे.त्यामुळं असल्या आंदोलन चा फायदा नक्की कोणाला होत आहे याची चर्चा सर्वत्र सुरू आहे.

Comments