नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्यावरील शाईफेक म्हणजे राजकीय षडयंत्र, भ्याड हल्ल्याचा निषेध - खासदार धनंजय महाडिक
नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्यावरील शाईफेक म्हणजे राजकीय षडयंत्र, भ्याड हल्ल्याचा निषेध - खासदार धनंजय महाडिक
कोल्हापूर ११ सिटी न्यूज नेटवर्क
भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्यावरील शाईफेक प्रकरणाचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे. जाणून बुजून आणि कटकारस्थान रचून हा भ्याड हल्ला झाला असून, त्या मागचे खरे सुत्रधार लवकरच समोर येतील, असा दावा खासदार महाडिक यांनी केलाय. चंद्रकांतदादा पाटील यांच्या विधानाचा सोयीस्कर विपर्यास अर्थ काढून सामाजिक तेढ निर्माण करण्याचा काही राजकीय संधीसाधू मंडळींचा डाव आहे. मात्र हा डाव यशस्वी होणार नाही. कारण चंद्रकांतदादा पाटील यांच्या मनातील महापुरूषांबद्दल असलेली निष्ठा आणि आदर सर्वांनाच माहित आहे, असं खासदार महाडिक यांनी नमुद केले आहे.
.jpeg)
Comments
Post a Comment