टिप्परचालकांची 'आप'च्या नेतृत्वात महापालिकेसमोर मूक निदर्शने
किमान वेतन, पी एफ, आरोग्य विमा देण्याची मागणी
कोल्हापूर ३० सिटी न्यूज नेटवर्क
शहरातील कचरा उठावाचे काम टिप्परच्या माध्यमातून होते. महापालिकेने टिप्पर चालकांचे कंत्राट दिले आहे. डी एम एंटरप्राइजकडे असलेल्या टिप्पर चालकांना अद्याप भविष्य निर्वाह निधी, इ एस आय सी कार्ड या सुविधा दिल्या गेल्या नाहीत. किमान वेतन कायदा अस्तित्वात असून देखील त्यांना तुटपुंज्या वेतनावर काम करावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर टिप्पर चालकांचे प्रश्न घेऊन आम आदमी पार्टीने सत्याग्रह आंदोलन सुरू केले आहे.
आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी टिप्पर चालकांनी महानगरपालिकेसमोर जमून मूक निदर्शने केली. किमान वेतन मिळालेच पाहिजे, पीएफ, आरोग्य विमा दिलाच पाहिजे या आशयाचे फलक घेऊन शंभरहून अधिक टिप्पर चालक सहभागी झाले होते.
टिप्पर चालकांच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहील. महापालिका अधिकाऱ्यांनी हे आंदोलन गांभीर्याने घ्यावे, अन्यथा संपाचे आयुध उपसावे लागेल असे शहर संघटक सूरज सुर्वे यांनी सांगितले.
यावेळी उत्तम पाटील, अभिजित कांबळे, संजय साळोखे, मोईन मोकाशी, आदम शेख, मयूर भोसले, उमेश वडर, बबन भालेराव, राज कोरगावकर, प्रथमेश सूर्यवंशी, सदाशिव कोकितकर, नितीन कवाळे, रणजित बुचडे, संजय राऊत, करण चौधरी, जयसिंग चौगुले आदी उपस्थित होते.
Comments
Post a Comment