द्वितीय श्रीपाद कुलकर्णी स्मृती खुल्या आंतरराष्ट्रीय गुणांकन बुद्धिबळ स्पर्धेत रेंदाळचा श्रीराज भोसले ला अजिंक्यपद

 द्वितीय श्रीपाद कुलकर्णी स्मृती खुल्या आंतरराष्ट्रीय गुणांकन बुद्धिबळ स्पर्धेत रेंदाळचा श्रीराज भोसले ला अजिंक्यपद



 पनवेलचा पारस उपविजेता तर गुजरातचा कर्तव्य तृतीय*


कोल्हापूर 11 सिटी न्यूज नेटवर्क

 न्यू एज्युकेशन सोसायटीच्या राम गणेश गडकरी हॉल येथे चेस असोसिएशन कोल्हापूर ने आयोजित केलेल्या द्वितीय श्रीपाद कुलकर्णी स्मृति खुल्या आंतरराष्ट्रीय गुणांकन बुद्धिबळ स्पर्धा संपन्न झाल्या.जागतिक बुद्धिबळ संघटना, अखिल भारतीय बुद्धिबळ संघटना, महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना व कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने झालेल्या या स्पर्धा सारस इलेक्ट्रॉनिक्सने पुरस्कृतत केल्या होत्या.स्पर्धेच्या अंतिम नवव्या फेरीमध्ये आठ पैकी आठ गुण घेऊन आघाडीवर असलेल्या कोल्हापूरच्या (रेंदाळ) श्रीराज भोसले ने पनवेलच्या पारस भोईरला बरोबरीत रोखत साडेआठ गुणांसह अजिंक्यपद पटकाविले त्याला रोख एकवीस हजार चषक व फिरता चषक देऊन सन्मानित केले.तृतीय मानांकित पनवेलच्या पारस भोईरला साडेसहा गुण व सरस टायब्रेक गुणामुळे उपविजेतेपद मिळाले त्याला रोख पंधरा हजार रुपये व चषक देऊन सन्मानित केले.अग्रमानांकित गुजरातचा कर्तव्य आन्दकट साडेसहा गुणासह तृतीय स्थानावर घसरला त्याला रोख दहा हजार रुपये व चषक प्रदान करण्यात आले.सहा गुण झालेले एकूण नऊ जण टाय ब्रेक गुणानुसार पुढील प्रमाणे क्रमांक मिळवून बक्षीस पात्र ठरले.चौथा मंदार लाड गोवा, पाचवा प्रणव पाटील कोल्हापूर, सहावा सोहम खासबारदार कोल्हापूर, सातवा आदित्य सावळकर कोल्हापूर,आठवा अभिषेक गणीगर बेळगाव,नववा प्रज्वल आव्हाड अहमदनगर,दहावा किरण पंडितराव सेंट्रल एक्साईज, अकरावा प्रदीप आवडे सातारा, बारावा श्लोक शरणार्थी सोलापूर,साडेपाच गुण मिळवणारे अनुक्रमे तेरावा पद्मनाभ मेनन पुणे,चौदावा मिहीर श्रीखंडे पुणे,पंधरावा विक्रमादित्य चव्हाण सांगली या स्पर्धेचा बक्षीस समारंभ उद्योगपती सचिन शिरगावकर व ब्राह्मण सभा करवीर चे अध्यक्ष एडव्होकेट विवेक शुक्ल यांच्या हस्ते झाला.यावेळी व्यासपीठावर स्पर्धा पुरस्कर्ते श्रीमती स्नेहा कुलकर्णी, श्रीनिवास कुलकर्णी, शरयू कुलकर्णी,मुग्धा कुलकर्णी, बुद्धिबळ संघटनेचे प्राध्यापक अरुण मराठे,एडवोकेट अजित कुलकर्णी, आनंद कुलकर्णी, महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे सहसचिव भरत चौगुले, मनीष मारुलकर, उत्कर्ष लोमटे व आरती मोदी उपस्थित होते.आंतरराष्ट्रीय भरत चौगुले यांनी मुख्य पंच म्हणून काम पाहिले त्यांना करण परीट,आरती मोदी मनीष मारुलकर व उत्कृष्ट लोमटे यांचे सहकार्य लाभले.स्पर्धा प्रमुख अनिल राजे, धीरज वैद्य,निहाल मुल्ला, सुयश जोशी,अनिश गांधी, नरेंद्र वरुडकर,महेश व्यापारी, डॉक्टर हरीश पाटील,नयन पाटील व राजेंद्र मकोटे यांनी स्पर्धा यशस्वी होण्यासाठी अथक परिश्रम घेतले.



उत्तेजनार्थ बक्षीसे पुढील प्रमाणे

उत्कृष्ट ज्येष्ठ बुद्धिबळपटू साठ वर्षावरील 

1)माधव देवस्थळी कोल्हापूर 2)सुरेंद्र सरदार ठाणे 3)आनंदराव कुलकर्णी कोल्हापूर 4)नंदकुमार सुरु उस्मानाबाद 5)विजय आहेर पुणे 

उत्कृष्ट महिला बुद्धिबळपटू

 1) तृप्ती प्रभू कोल्हापूर 2) शर्वरी कबनूरकर कोल्हापूर 3) मयुरी सावळकर कोल्हापूर 4) मानसी ठाणेकर पुणे 5) स्वरा बावडेकर इस्लामपूर

1900 गुणांकनाखालील उत्कृष्ट बुद्धिबळपटू

1)राजवीर पाटील गोवा 2)वेद भाटवडेकर पुणे 3)दीपंकर कांबळे फलटण 4)आकाश मडीवालर बेळगाव 5)आर्य पाटील पुणे

1600 गुणांकनाखालील उत्कृष्ट बुद्धिबळपटू

 1)कुणाल शिंदे सातारा 2)ऋषिकेश कबनूरकर कोल्हापूर 3)आर्य शेनवी कारापूरकर गोवा 4)अभिषेक भाकरे नाशिक 5)श्रेयस सर देशमुख पुणे 

1300 गुणांकनाखालील उत्कृष्ट बुद्धिबळपटू

1) हिमांशू दास मुंबई 2) रईस अहमद खान बेळगाव 3)व्यंकटेश खाडे पाटील कोल्हापूर 4)ईशान कुलकर्णी सांगली 5)स्वरूप जोशी कागल

बिगर मानांकित उत्कृष्ट बुद्धिबळपटू

1)हर्षवर्धन काबरा बेळगाव 2)सहर्ष टोकले दापोली 3)अनिकेत वारुळे सातारा 4)सुनील त्रिंबके पुणे 5)सर्वेश पोतदार कोल्हापूर

पंधरा वर्षाखालील उत्कृष्ट बुद्धिबळपटू

 1) शंतनू पाटील कोल्हापूर 2)आदित्य कोळी सांगली 3)हर्ष बावडेकर इस्लामपूर 4)सिद्धेश शिंदे सांगली 5)श्रेयस जोशी सातारा

तेरा वर्षाखालील उत्कृष्ट बुद्धिबळपटू

1)महिमा शिर्के कोल्हापूर 2)सोहम शेटे बार्शी 3)प्रज्वल वरुडकर कोल्हापूर 4)मृण्मयी गोसावी पुणे 5)समर्थ वणकुद्रे कोल्हापूर

अकरा वर्षाखालील उत्कृष्ट बुद्धिबळपटू 

1)संस्कृती सुतार नांदणी 2)अरिना मोदी कोल्हापूर 3)अंशुल चुयेकर चुये 4)सिद्धार्थ चौगुले कोल्हापूर 5)सिद्धी बुबने जयसिंगपूर

नऊ वर्षाखालील उत्कृष्ट बुद्धिबळपटू

  1)रियार्थ पोद्दार इचलकरंजी 2)अद्विक फडके सांगली 3)विवान सोनी इचलकरंजी 4)ऋत्विक शिंदे सातारा 5)विपुल कदम गोवा

*सात वर्षाखालील उत्कृष्ट बुद्धिबळपटू* 

1)वरद पाटील बस्तवडे 2) वेदांत कुलकर्णी पुणे 3) दिविज कात्रुट कोल्हापूर

*उत्कृष्ट कोल्हापुर जिल्ह्यातील बुद्धिबळपटू*

 1)श्रावणी खाडे पाटील कोल्हापूर 2)अर्णव हरीश पाटील कोल्हापूर 3)नारायण हरीश पाटील कोल्हापूर 4)रवींद्र कुलकर्णी फोंडा 5)साक्षद खांडेकर कोल्हापूर

Comments