टेंबलाई मंदिरातील समस्या सोडवा : देवस्थान समितीला 'आप'चे निवेदन
कोल्हापूर २७ सिटी न्यूज नेटवर्क
टेंबलाई टेकडी व मंदिर परिसरातील अस्वच्छता, प्लास्टिक कचरा, वाढलेले गवत, ओल्या पार्ट्या यामुळे मंदिराचे पावित्र्य धोक्यात आले आहे. येथे येणाऱ्या भाविकांना गैरसोईचा सामना करावा लागत आहे. टेंबलाई मंदिराची देखरेख पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने केली जाते. परंतु अनेक वर्षांपासून मंदिर परिसराची डागडुजी न झाल्याने अनेक समस्या उद्भवत आहेत.
कायमस्वरुपी स्वच्छता कर्मचारी नेमावेत, परिसराची सुरक्षितता राखण्यासाठी वाॅचमन नेमावा अशी मागणी 'आप' शिष्टमंडळाने पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडी यांच्याकडे केली. या कामी विभाग प्रमुख प्रसाद सुतार यांनी पुढाकार घेतला.
यावेळी शहर उपाध्यक्ष संतोष घाटगे, शहर संघटनमंत्री सुरज सुर्वे, शहर संघटक संजय साळोखे, सामाजिक कार्यकर्ते बबन कावडे, प्रसाद सुतार, अमित कांबळे, शशिकांत हाबळे, श्री उंडाळे, राज कोरगावकर, प्रथमेश सुर्यवंशी, मयुर भोसले, समीर लतिफ यांच्यासह टेंबलाईवाडी व विक्रमनगर येथील नागरिक उपस्थित होते.
Comments
Post a Comment