गोव्यातील नवी राष्ट्रीय आयुर्वेद परिषद ही भारताची नवी ओळख ठरेल- वैद्य अश्विनी मालकर

 गोव्यातील नवी राष्ट्रीय आयुर्वेद परिषद ही भारताची नवी ओळख ठरेल- वैद्य अश्विनी मालकर  




पणजी गोवा ११ सिटी न्यूज नेटवर्क

                   पणजी गोवा येथे सुरू असलेली आणि भारतासह विविध देशातून प्रतिनिधी आलेली नववी आंतरराष्ट्रीय आयुर्वेद परिषद ही नक्कीच भारताची एक नवीन विधायक ओळख ठरेल . भारत विविध पैलूनी  महासत्ता होत असून आयुर्वेदाचे महत्त्व यामुळे पुन्हा एकदा अधोरेखित झालेलेआहे आणि गोवा आता पर्यटना बरोबरच एक आर्युवेदी क  वैद्यकीय हब म्हणूनही या निमित्ताने विकसित आहे . आता गोव्यामध्ये आयुर्वेदाच्या एमडी शिक्षणाची सोय झालेली आहे त्याचबरोबर किडनी उपचारासाठी ह आधुनिक सुविधा या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत त्यामुळेच ही परिषद या विविध पैलूंनी यशस्वी होणार असून सर्वांना  मोदींच्या मार्गदर्शनाची आणि त्यांच्या भाषणाचे वेध लागलेले आहे . या परिषदेमध्ये सहभागी होऊन मी आणि माझ्या सहकाऱ्यांना अगदी मोलाची अशी माहिती नक्कीच मिळालेली आहे धन्यवाद . या साठी आरोग्य भरतीच्या वतीने संयोजकांचे मनस्वी आभार ! !



Comments