MPL 48 वी राष्ट्रीय महिला अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धाचा संजय घोडावत युनिव्हर्सिटी मध्ये शानदार उद्घाटन सोहळा संपन्न
MPL 48 वी राष्ट्रीय महिला अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धाचा संजय घोडावत युनिव्हर्सिटी मध्ये शानदार उद्घाटन सोहळा संपन्न
कोल्हापूर २६ सिटी न्यूज नेटवर्क
जागतिक बुद्धिबळ संघटना,अखिल भारतीय बुद्धिबळ संघटना, महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना व कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ संघटनाच्या मान्यतेने चेस असोसिएशन कोल्हापूरनेे आयोजित केलेल्या MPL 48 वी राष्ट्रीय महिला अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धां आज पासून सुरू झाल्या.संजय घोडावत युनिव्हर्सिटी,अतिग्रे येथे आयोजित केलेल्या या स्पर्धेचा दिमाखदार उद्घाटन सोहळा संपन्न झाला.सुहासराजे ठोंबरे आखाडा चे शाहीर मिलींद सावंत यांचा पोवाडा व मर्दानी खेळाने जोश पूर्ण वातावरणात कार्यक्रमाची सुरुवात झाली.सर्व सहभागी महिला खेळाडूंचा कोल्हापूरी फेटे बांधून सन्मान करण्यात आला. सर्व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाल्यावर वडगावचे आमदार श्री राजू बाबा आवळे व संजय घोडावत युनिव्हर्सिटी चे विश्वस्त विनायक भोसले यांनी बुद्धिबळाच्या पटावर चाल करून स्पर्धेचे उद्घाटन केले.यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे कार्याध्यक्ष श्री सिद्धार्थ मयूर, उपाध्यक्ष गिरीश चितळे, चेतन नरके, संजय घोडावत युनिव्हर्सिटीचेे कुलगुरू डॉक्टर अरुण पाटील रजिस्टर विवेक कायंदे, पॉलिटेक्निकचे प्राचार्य विराट गिरी, महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे सचिव निरंजन गोडबोले खजिनदार विलास म्हात्रे स्पर्धेचे मुख्य आंतरराष्ट्रीय पंच कर्नाटकचे एम् मंजुनाथ, चेस असोसिएशन कोल्हापूरचे भरत चौगुले धीरज वैद्य व मनीष मारुलकर उपस्थित होते.यावेळी महिला ग्रँडमस्टर नॉर्म पूर्ण झालेल्या कोल्हापूरच्या महिला आंतरराष्ट्रीय मास्टर ऋचा पुजारीचा व स्पर्धेत सहभागी झालेल्या आघाडीच्या मानांकित महिला बुद्धिबळपटूंचा विशेष सत्कार करण्यात आला.
वीस राज्यातील 104 नामवंत महिला बुद्धिबळपटू या स्पर्धेत सहभागी झाल्या आहेत.या स्पर्धेत दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय महिला ग्रँडमास्टर वंटीका अगरवाला अग्रमानांकन मिळाले आहे तर गतविजेत्या महिला ग्रँडमास्टर महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखला द्वितीय मानांकन आहे.पेट्रोलियम स्पोर्ट्स बोर्डची आंतरराष्ट्रीय मास्टर सौम्या स्वामीनाथनला तृतीय मानांकन मिळाले आहे. यांच्याबरोबर महिला ग्रँडमास्टर मेरी आना गोम्स पेट्रोलियम स्पोर्ट्स बोर्ड,अर्जुन पुरस्कार विजेते गोव्याची महिला ग्रँडमास्टर भक्ती कुलकर्णी, रेल्वेची आंतरराष्ट्रीय महिला मास्टर, एम महालक्ष्मी, आंतरराष्ट्रीय महिला मास्टर कोल्हापूरची ऋचा पुजारी, आंतरराष्ट्रीय महिला मास्टर औरंगाबादची साक्षी चितलांगी,आंतरराष्ट्रीय महिला मास्टर कर्नाटकची ईशा शर्मा,महिला ग्राम मास्टर तामिळनाडूची श्रीजा शेषाद्री,आंतरराष्ट्रीय महिला मास्टर पुण्याची आकांक्षा हगवणे,आयुर्विमा महामंडळाच्या महिला ग्रँडमास्टर,स्वाती घाटे व किरण मनीषा मोहांती,तामिळनाडूचे महिला ग्रांड मास्टर व्ही वर्षीणी,पश्चिम बंगालची महिला आंतरराष्ट्रीय मास्टर अपराजिता गोचीकर,आंध्र प्रदेशची महिला आंतरराष्ट्रीय मास्टर बोमीनी अक्षया या आघाडीच्या नामांकित बुद्धिबळपटूचा समावेश या स्पर्धेत झाला आहे.
Comments
Post a Comment