MPL 48 वी राष्ट्रीय महिला अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धा :वंतिका,दिव्या,मेरी,भक्ती,ऋचा सह बावीस जण संयुक्तपणे आघाडीवर

 MPL 48 वी राष्ट्रीय महिला अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धा: वंतिका,दिव्या,मेरी,भक्ती,ऋचा सह बावीस जण संयुक्तपणे आघाडीवर



कोल्हापूरच्या तृप्ती, शर्वरी,औरंगाबादची श्रुती व सांगलीच्या ईश्वरीची पहिल्या फेरीत चमकदार कामगिरी


कोल्हापूर २७ सिटी न्यूज नेटवर्क

संजय घोडावत युनिव्हर्सिटी, रूकडी-अतिग्रे  येथे सुरू असलेल्या एम पी एल 48 व्या राष्ट्रीय महिला अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीनंतर अग्रमानांकित आंतरराष्ट्रीय महिला ग्रँडमास्टर दिल्लीची वंतिका अगरवाल सह द्वितीय मानांकित गतविजेती महाराष्ट्र ची आंतरराष्ट्रीय महिला ग्रँडमास्टर दिव्या देशमुख,चतुर्थ मानांकित पेट्रोलियम स्पोर्ट्स बोर्डची आंतरराष्ट्रीय महिला ग्रँडमास्टर मेरी आना गोम्स,पाचवी मानांकित अर्जुन पुरस्कार विजेती आंतरराष्ट्रीय महिला मास्टर गोव्याची भक्ती कुलकर्णी,सातवी मानांकित कोल्हापूरचीआंतरराष्ट्रीय महिला मास्टर ऋचा पुजारी सह,तामिळनाडूची सी एम संयुक्ता,महाराष्ट्राची साक्षी चितलांगी,पश्चिम बंगालची ब्रिष्टी मुखर्जी,महाराष्ट्र मकिजा आश्ना,तमिळनाडूची श्रीजा शेषाद्री,महाराष्ट्र ची आकांक्षा हगवणे व सृष्टी पांडे,आंतरराष्ट्रीय मास्टर पेट्रोलियम स्पोर्ट्स बोर्डची निशा मोहता,तामिळनाडूची व्ही. वर्षीनी,आंध्र प्रदेशची बोंमिणी अक्षया,महाराष्ट्राची विश्वा शहा व ऋतुजा बक्षी,केरळची निम्मी जॉर्ज,महाराष्ट्र वृषाली देवधर,आयुर्विमा महामंडळाची आंतरराष्ट्रीय महिला मास्टर किरण मनीषा मोहांती व स्वाती घाटे,गुजरातची तेजस्विनी सागर या 22 जणी दोन गुणासह संयुक्तपणे आघाडीवर आहेत.तृतीय मानांकित इंडियन ऑइलची आंतरराष्ट्रीय मास्टर सौम्या स्वामीनाथन सह ,पश्चिम बंगालची यश ज्योती बिर,तेलंगणाची पतलूरी श्रीझा,हरियाणाची इशवी अगरवाल व राजस्थानची दक्षता कुमावत या सहाजणी दीड गुणासह संयुक्तपणे द्वितीय स्थानावर आहेत.सी. लक्ष्मी तामिळनाडू,भाग्यश्री पाटील महाराष्ट्र,म्रितीका मलिक पश्चिम बंगाल 

 व कर्नाटकची इशा शर्मा सह एकूण 37 जण संयुक्तपणे तृतीय स्थानावर आहेत.दुसऱ्या फेरीत पहिल्या पटावर अग्रमानांकित दिल्लीच्या वंतिका अगरवाल ने च्या तामिळनाडूच्या सी. लक्ष्मीला किंग्स इंडियन डिफेन्स प्रकाराने सुरू झालेल्या डावात 34 व्या चालीस पराभूत केले.दुसऱ्या पठावर महाराष्ट्राच्या गतविजेत्या दिव्या देशमुख ने महाराष्ट्राच्याच भाग्यश्री पाटील विरुद्ध सीसीलियन बचाव प्रकाराने सुरू झालेल्या डावात दिव्याने 44 व्या चालीस भाग्यश्रीला डाव सोडण्यास भाग पाडले.पेट्रोलियम स्पोर्ट्स बोर्डच्या मेरी आना गोम्स ने सिसीलियन बचाव प्रकाराने सुरू झालेल्या डावात महाराष्ट्रच्या मिथाली पाटीलला 38 चालीत पराभूत केले.औरंगाबादच्या श्रूती काळेने महाराष्ट्र च्या आंतरराष्ट्रीय महिला मास्टर मृदल डेहणकरला अवघ्या 22 चालीत पराभवाचा धक्का देताना सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

तत्पूर्वीच्या पहिल्या फेरीत कोल्हापूरच्या व सांगलीच्या मुलींनी धक्कादायक निकाल नोंदवले.कोल्हापूरच्या तृप्ती प्रभूने तमिळनाडूच्या एस हरिणी ला पराभूत करून पहिल्या फेरीतला सर्वात धक्कादायक निकाल नोंदविला.सांगलीच्या ईश्वरी जगदाळे ने आंतरराष्ट्रीय महिला मास्टर नागपूरच्या मृदल डेहणकरला 42 चालीत बरोबरीत रोखले.कोल्हापूरच्या शर्वरी कबनूरकरने  तमिळनाडूच्या एल् ज्योत्स्नाला बरोबरीत रोखत पहिला दिवस गाजविला.

Comments