लिंगायत समाज संस्था -राणी चन्नम्मा महिला मंडळ कोल्हापूर यांचे तर्फे प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न

 लिंगायत समाज संस्था -राणी चन्नम्मा महिला मंडळ कोल्हापूर यांचे तर्फे  प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न 




कोल्हापूर २९ सिटी न्यूज नेटवर्क 

लिंगायत समाज संस्था -राणी चन्नम्मा महिला मंडळ कोल्हापूर यांचे तर्फे  प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध स्पर्धा , गेम्स आणि मकर संक्रांति निमित्त हळदी -कुंकू वाण कार्यक्रम चित्रदुर्ग मठ , दसरा चौक , कोल्हापूर येथे  मोठ्या उत्साहात संपन्न झाला .यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करण्यासाठी मा. शिल्पा ठोकडे तहसीलदार कागल या उपस्थित होत्या. 

महिलांना मार्गदर्शन करताना त्या म्हणाल्या, बाराव्या शतकात महिलांना समान अधिकार देणारे महात्मा बसवन्ना यांचे विचार काळाच्याही पुढचे आहेत. महिलांनी आपल्यातील सुप्त गुणांना वाव देऊन समाजात आपल्या कर्तुत्वाने पुढे आले पाहिजे. यावेळी आपली आजपर्यंतची वाटचाल कशी झाली याबद्दलही त्यांनी महिलांशी वार्तालाप केला. फक्त गेम्स आणि हळदीकुंकू यात अडकून न राहता स्वतःच्या व्यक्तिमत्व विकासासाठी सुद्धा वेगवेगळे उपक्रम घ्यावेत अशी सूचना त्यांनी केली.  स्पर्धांमधील विजेत्यांना त्यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.


कार्यक्रमाची सुरुवात 

महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमा पुजनाने झाली .

त्यानंतर श्रद्धा चितारी यांनी गणेश वंदना  नृत्याचे सादरीकरण केले .विणा पाटील यांनी विविध गेम्स घेतले .

 पाहुण्यांची ओळख  वेदिका पाटील यांनी करून दिली. पाहुण्यांचे स्वागत मंडळाच्याअध्यक्षा  राजश्री सावर्डेकर यांनी केले.  त्यांनी आपल्या मनोगतातून मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांविषयी  सविस्तर माहिती सांगितली . प्रास्ताविक माननीय सरलाताई पाटील यांनी केले. सूत्रसंचालन वारणा वडगावकर यांनी केले

म . बसवेश्वरांचे वचन गायन महानंदा पाटील यांनी केले . शुभांगी चितारी यांनी आभार प्रदर्शन केले . कार्यकारी मंडळ - सदस्या - मंदाकिनी तंबाके , वैशाली पाटील ,नंदा निर्वाणी, अर्चना हिडदुग्गी ,श्वेता तारळी, यांच्यासह सर्व महिलांनी नियोजनात अतिशय उत्साहाने सहभाग घेतला.

Comments