पीपल्स रिपब्लिकन पार्टी व बाळासाहेबांचे शिवसेना (शिंदे गट) च्या वतीने भारत नगर व साळुंखे पार्क येथील परिसरातील नागरिकांच्या विविध मागणीसाठी छत्रपती चौक रिंग रोड येथे आज चक्काजाम आंदोलन

 पीपल्स रिपब्लिकन पार्टी व बाळासाहेबांचे शिवसेना (शिंदे गट) च्या वतीने भारत नगर व साळुंखे पार्क येथील परिसरातील नागरिकांच्या विविध मागणीसाठी छत्रपती चौक रिंग रोड येथे आज चक्काजाम आंदोलन करण्यात आले 


कोल्हापूर २७ सिटी न्यूज नेटवर्क 

     सदर परिसरामध्ये दहा दिवस पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे पाणी येत नसल्याने परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत याच्या निषेधार्थ कोल्हापूर महानगरपालिका व प्रशासनाचा निषेध करण्यात आला.त्याचप्रमाणे यावेळी भारत नगर साळुंखे पार्क या ठिकाणी ड्रेनेज लाईन लवकरात लवकर पूर्ण व्हावी व झोपडपट्टी कार्ड ऐवजी प्रॉपर्टी कार्ड मिळावे त्याचबरोबर परिसरामध्ये आरोग्याचे प्रश्न निर्माण होऊन परिसरातील नागरिकांना अनेक रोगांना सामोरे जावे लागत आहे त्यासाठी परिसरामध्ये नेहमीच साफसफाई करण्यात यावी याकरिता व अन्य मागण्यांकरिता परिसरातील नागरिकांच्या वतीने बाळासाहेबांची शिवसेना शिंदे गट व पीपल्स रिपब्लिकन पक्ष यांच्या वतीने परिसरातील शेकडो लोक रस्त्यावर उतरून चक्काजाम आंदोलन करण्यात आले यामध्ये यावेळी कोल्हापूर महानगर पालिकेच्या उपस्थित अधिकाऱ्यांना निवेदन दिले व मागणी मान्य न झाल्यास 15 दिवसामध्ये महानगर पालिकेला घेराव घालून पीपल्स पीपल्स रिपब्लिकन पार्टी व बाळासाहेबांचे शिवसेना शिंदे गट च्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.



     यामध्ये पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे शहर अध्यक्ष सोमनाथ घोडेराव यांच्या नेतृत्वामध्ये हे चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यावेळी उपस्थित शिवसेना शाखाप्रमुख गोविंद वैदु पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे शहर उपाध्यक्ष प्रकाश आंगरखे, शहर संघटक विनोद शिंदे,शहर संघटक तानाजी निकम, धर्माजी कांबळे,राजू लोंढे,विमल कांबळे,रेश्मा शिंदे, माया चव्हाण,शालन चव्हाण,सकुंतला कांबळे, मंगल कसबे,मीरा घोडेराव, भारताबाई कोळी,कुमार वैदू,दुर्गापा वैदू,कुमार कुचकोर्वी, वैकाल कुचकुर्वे,राज वैदू, व भागातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.भागातील महिलांचा मोठ्या संख्येने सहभाग होता.


Comments