शहीद महाविद्यालयामध्ये राज्यस्तरीय कवी-ओवी संमेलन संपन्न

 शहीद महाविद्यालयामध्ये राज्यस्तरीय कवी-ओवी संमेलन संपन्न



कवितेमध्ये  प्रतिज्ञा कांबळे  आणि साउताई बोभाटे यांना ओवीमध्ये  प्रथम पारितोषिक 


कोल्हापूर (तिटवे) ३० सिटी न्यूज नेटवर्क 



     येथील शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालय आणि दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा,  कोल्हापूर यांच्या राज्यस्तरीय कवी-ओवी संमेलन व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेस राज्यभरातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी व महिलांनी सहभाग नोंदवला. कवितेमध्ये प्रतिज्ञा कांबळे, धनश्री राजीगरे, साउताई बोभाटे यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय पारितोषिक प्राप्त झाले. साउताई बोभाटे, आरती कोळी, गायत्री टिपुगडे  यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय पारितोषिक प्राप्त झाले. प्रा. जयवंत सुतार , प्रा. आर. पी. वारके यांनी कवितेसाठी तर यांनी    डॉ. आनंद वारके, रामचंद्र सुतार  यांनी ओवी स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून जबाबदारी पहिली. 

         डॉ. सुनंदा शेळके, लता ऐवळे,नीलम माणगावे अशा दिग्गज लेखिका व कवयित्रीनी या कवी संमेलनामध्ये सादरीकरण केले. कविता कशी तयार होते, त्या मागे भावना कशा असतात यासोबतच कवितेच्या विविध पैलूंवर त्यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. कवी संमेलनाचा विद्यार्थिनींनी आस्वाद घेतला. या स्पर्धेसाठी राज्यभरातील चाळीस स्पर्धकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. 

             ओवी संमेलनामध्ये सुप्रसिद्ध लेखिका सौ. मीरा सहस्त्रबुद्धे यांनी मार्गदर्शन केले.  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्याध्यक्ष प्रा. जालंदर पाटील हे या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थित होते. आयुष्य नावाचा आपला अभ्यासक्रम तयार करून त्यावर आपल्या बलस्थानाच्या सहाय्याने स्वार होऊन आपण सर्वांनी आयुष्यात अमुलाग्र यश मिळवावे अशा शब्दात त्यांनी याप्रसंगी  ओवी स्पर्धेसाठी कोल्हापूर आणि परिसरातून दहा गटांनी सहभाग नोंदवला होता. आपली संस्कृती जपण्याच्या अनुषंगाने राबविलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. 



          कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी वीरपत्नी लक्ष्मीबाई पाटील होत्या.  संस्थेचे मुख्य मार्गदर्शक डॉ. जगन्नाथ पाटील प्रमुख उपस्थित होते. तिटवे गावच्या लोकनियुक्त सरपंच सौ. अर्चना किल्लेदार, उपसरपंच अमोल पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अजित पोवार व सर्व ग्राम पंचायत सदस्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी राम माने, राम इंगळे, अशोक फराकटे आदी मान्यवर उपस्थित होते. 

          यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष प्रा. सुनील पाटील,सचिव दिलीप देसाई, विश्वस्त अनिल पाटील आदींसह विविध पदाधिकारी  उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. प्रशांत पालकर यांनी केले. प्रा. राधिका शिंदे, तेजस्विनी परबकर यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे समन्वयन केले. सूत्रसंचालन समृद्धी पाटील, साक्षी पाटील यांनी केले तर आभार तेजस्विनी परबकर यांनी मानले. या कार्यक्रमासाठी राज्यभरातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी, ओवी सादर करणाऱ्या महिला  उपस्थित होत्या.

Comments