शाहू साखर चे समरजित सिंह घाटगे यांची सिद्धगिरी कणेरी मठास सदिच्छा भेट

    शाहू साखर चे समरजित सिंह घाटगे यांची सिद्धगिरी कणेरी मठास सदिच्छा भेट - प पू  स्वामीजी समवेत सुमंगलम् पुर्वतयारी सह सहभाग संदर्भाने   चर्चा                 





  कोल्हापूर २७ सिटी न्यूज नेटवर्क 

 शाहू साखर कारखाना - (कागल ) चेअरमन, भाजपा जिल्हाध्यक्ष , शेती - सहकार अभ्यासक समरजितसिंह घाटगे यांनी सिद्धगिरी कणेरी मठ येथे सदिच्छा भेट देऊन दिनांक 20 ते 25 फेब्रुवारी दरम्यान  होत असलेल्या ' शुभमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सव '  या राष्ट्रीय उपक्रमा संदर्भात सुरू असलेल्या पूर्वतयारीचा आढावा घेत यामध्ये सहभागी होण्या संदर्भात  परमपूज्य अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी  यांच्याशी सविस्तर चर्चा केली .या महोत्सवामुळे कोल्हापूर सह महाराष्ट्राची एक वेगळी विधायक ओळख राष्ट्रीय पातळीवर निर्माण होणार आहे तसेच यामुळे सेंद्रिय शेती पासून पर्यटन तसेच निसर्ग पूरक विविध विधायक उपक्रमासाठी दमदार अशी सुरुवात ही नव नवीन पैलूनी  व्यापकपणे  होणार आहे . त्या दृष्टीने हा महोत्सवात आपले संबंधित शाहू सहकारी साखर कारखाना सह आपल्या संबंधित विविध संस्था संघटनाचा  मध्ये सहभागी  यासाठी आपण आग्रही राहणार असून पूर्वतयारीसह प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या विविध विभागात आपले पदाधिकारी -  कार्यकर्ते सहभागी होतील असेही यावेळी  घाटगे यांनी नमूद केले तसेच सुरू असलेल्या पूर्वतयारीच्या विविध विभागात प्रमुखांची त्यांनी चर्चा करून आढावा घेतला आणि उपयुक्त अश्या सूचनाही  केल्या तसेच आपण व आपले विविध संस्था - संघटनाचे पदाधिकारी यापुढे नियमित संपर्कात राहून सहकार्य करतील असे ही समरजितसिंह घाटगे यांनी आवर्जून नमूद केले .

Comments