जागतिक शांतीदूत श्री श्री रविशंकरजी आगमनाची जय्यत तयारी

 जागतिक शांतीदूत श्री श्री रविशंकरजी आगमनाची जय्यत तयारी 



कोल्हापूर २७ सिटी न्यूज नेटवर्क 

पद्मविभूषित जागतिक शांतिदूत अध्यात्मक गुरु आर्ट ऑफ लिविंग चे संस्थापक श्री श्री रविशंकर जी 31 जानेवारी २०२३ आणि १ फेब्रुवारी २०२३ या दोन दिवसात कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. गुरुजी गुरुजी गुरुदेव यांच्या सानिध्यात महा सत्संग 31 जानेवारीला सायंकाळी ६ वाजता आहे. या महा सत्संगाचा लाभ कोल्हापूर,  सिधुदुर्ग, सातारा, सांगली आणि बेळगांव मधून  सुमारे दीड लाख लोक लाभ घेतील. गान ज्ञान आणि ध्यान या संकल्पनेनुसार सत्संगमध्ये  श्री श्री द्वारा ज्ञान चर्चा आणि ध्यान होईल. तत्पूर्वी श्री श्री नवनिर्वाचित १०२५ सरपंचाना गुरु ग्राम संदेश या कार्यक्रमाद्वारा मार्गदर्शन करतील.


 देशाचे रहस्य हे ग्रामीण भारताच्या विकासामध्ये आहे आणि ग्रामीण भारताला जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध केल्यास समाजातील शेवटची व्यक्ती सुखी होऊ शकते यावर श्री श्री चा विश्वास असल्याने ग्रामीण भागात आदर्श राज्यकारभार आणि आदर्श ग्राम निर्मिती होऊन या गावांचा शाश्वत विकास व्हावा यासाठी ते सरपंच आणि लोकप्रतिनिधी यांना मार्गदर्शन करतील.

 यामध्ये ते आर्ट ऑफ लिविंग च्या 30 वर्षापासून राबवली जाणारी "आदर्श ग्राम योजना" आणि विविध ग्रामीण प्रकल्पाबद्दल माहिती हा कार्यक्रम मंगळवारी 31 जानेवारीला दुपारच्या राजमाता जिजामाता सभागृह शिवाजी विद्यापीठ येथे होणार आहे .

बुधवार 1 फेब्रुवारी रोजी सकाळी सात वाजता दक्षिणकाशी करवीर क्षेत्रामध्ये "महालक्ष्मी होम" होत आहे.

 या कामासाठी विशेषतः बेंगलोर आश्रम स्थित वेद विज्ञान विद्यापीठातील प्रशिक्षित वैदिक पंडित येणार आहेत.  हा ओम श्री च्या सानिध्यात  होत असल्याने .त्यालाही आगळे वेगळे महत्व प्राप्त झाले महा सत्संग आणि महालक्ष्मी होम यांच्या तयारीसाठी नजीकच्या जिल्ह्यातील शंभर आणि कोल्हापुरातील दीडशे प्रशिक्षक आणि हजारो सेवक गेल्या दोन महिन्यापासून अहोरात्र तयारी करत आहेत . तब्बल बारा वर्षानंतर श्री श्री रविशंकर जी करवीर नगरीत  येत असून त्याचा काही उत्साह वेगळाच आहे. 

 2011 मध्ये झालेल्या अभंग नाद या कार्यक्रमात 2250 वारकरी आणि १३५६ धनगरी ढोल वादक यांनी सहभाग घेतला होता त्याची नोंद गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये आहे त्यावेळी सव्वा लाख लोकांची उपस्थिती होती.

माहिती आर्ट ऑफ लिविंग वतीने  आज दिली यावेळी आर्ट ऑफ लिविंग चे स्वामी, ऋषी देववृत, आर्ट ऑफ लिव्हिंग चे विश्वस्त प्रदीप खानविलकर , गीतांजलीदीदी चींमनावर, राजश्री भोसले पाटील , डिंपल गजवणी , सचिन मुधाळे, लीना बावडेकर ,संतोष लाड राजेंद्र लकडे आणि आर्ट ऑफ लिव्हिंग चे सदस्य उपस्थित होते



  

Comments