कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ७४ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

 कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ७४ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

       


बँकेचे अध्यक्ष व आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांच्या हस्ते ध्वजारोहण   

       

कोल्हापूर, दि. २६ सिटी न्यूज नेटवर्क 

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या केंद्र कार्यालयामध्ये ७४ वा प्रजासत्ताक दिन बँकेचे अध्यक्ष आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांच्या हस्ते ध्वजारोहन करुन मोठया उत्साहात साजरा करणेत आला.


यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नाबार्डचे कोल्हापूर जिल्हा विकास प्रबंधक आशुतोष जाधव उपस्थित होते. तसेच, संचालक बाबासाहेब पाटील- आसुर्लेकर, संचालक विजयसिंह माने, संचालिका सौ. श्रुतीका शाहू काटकर, सौ. स्मिता युवराज गवळी, प्रशासकीय व्यवस्थापक जी. एम. शिंदे, कायदा व सल्ला विभागाचे व्यवस्थापक आर. जे. पाटील, अकाउंट बँकिंग विभागाचे व्यवस्थापक विकास जगताप, प्रशासन विभागाचे सहव्यवस्थापक एस. ए. वरुटे, शेती कर्जे विभागाचे सहव्यवस्थापक गिरीश पाटील व राजू पाटील, व्यक्तिगत कर्जे विभागाचे सहव्यवस्थापक सुनील लाड, ऑडिट विभागाचे सहव्यवस्थापक गिरीश माळी, सीएमए सेलचे सहव्यवस्थापक अल्ताफ मुजावर, सर्व उपव्यवस्थापक तसेंच केंद्र कार्यालय व कोल्हापूर शहरातील सर्व शाखांचे अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.  

       


.

Comments