अध्यात्मिक क्षेत्रातील दोन वंदनीय गुरुवर्या च्या स्नेह भेटीने अवघा सिद्धगिरी कणेरी मठ परिसर भारावला

 अध्यात्मिक क्षेत्रातील दोन वंदनीय गुरुवर्या च्या स्नेह भेटीने  अवघा सिद्धगिरी कणेरी मठ परिसर भारावला - पु . प . स्वामीजी आणि श्री श्री रवी शंकरजी यांती साधले अवघ्या समाज मनाचे हितगुज 



कोल्हापूर - कणेरी - ३१ सिटी न्यूज नेटवर्क 

 

विविध कलाविष्कारातून आणि आत्मसंवादातून जीवनाचा सहज सोपा मार्ग दाखवणारे  आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रमुख श्री श्री रवीशंकरजीआणि अध्यात्मला विविध सेवा कार्याची आणि शेतीपासून तंत्रज्ञानापर्यंतच्या प्रयोगशील  प्रबोधन उपक्रमाची जोड देत  प्रयोगशील पणे कार्यरत असलेले परमपूज्य अदृश्य का डसिद्धेश्वर स्वामीजी या अध्यात्मिक क्षेत्रातील दोन वंदनीय  गुरुवर्यांच्या भेटीने अवघा सिद्धगिरी कणेरी मठ परिसर भारावून गेला . आगामी २० ते 26 फेब्रुवारी दरम्यान संपन्न होत असलेल्या ' सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सवाच्या तयारीची पाहणी आपल्या कोल्हापूर  महाराष्ट्र प्रवासातील व्यस्त वेळा पत्रकातून वेळ काढत श्री श्री श्री रविशंकर जी गाणी प्रत्यक्ष भेट देवून बारकाईने पाहणी करत या भव्य दिव्य उत्सावास कौतुक सह शुभेच्छा दिल्या . 



सुमंगलम महोत्सव भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविणारा आणि पर्यावरण प्रबोधन करणारा महोत्सव आहे. समाजाच्या वेगवेगळ्या घटकांना सोबत घेऊन पूज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामी जे काम करत आहेत ते प्रेरणादायी आहे"असे हितगुज पर कौतुक ही त्यांनी केले .           पूज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामी यांनी सुमंगलम महोत्सवसंबंधी माहिती देत श्री श्री श्री रविशंकरजी यांना महोत्सव कालावधीत सर्व कार्यकर्त्या सह विविध उपक्रमात  सहभागी होण्याची विनंती केली. अवघ्या वीस दिवसांवर येऊन ठेपलेल्या या महाउत्सवाच्या पूर्वतयारीला या दोन अध्यात्मिक क्षेत्रातील दोन दिग्गज  गुरुवर्याच्या स्नेह भेटी सह  त्यांच्यातील अवघ्या समाज कल्याणाच्या हितगुज पर संवादाने सर्वच तयारीत असलेल्या भाविक -  कार्यकर्त्यांना एक नवा उत्साह  नक्कीच लाभला आहे . .






Comments