प्रजासत्ताक दिनानिमित्त उत्तरेश्वर थाळीतर्फे विविध कार्यक्रम
कोल्हापूर २५ सिटी न्यूज नेटवर्क
NANBAN फौंडेशन मातृभूमी चॅरिटेबल ट्रस्ट संचलित उतरेश्वर थाळी परिवारकडून प्रजासत्ताक दिनानिमित्त गरजूंना तिरंगा, व्हेज बिर्याणी व मिठाई मेजवानी असणारच तसेच दिवसभर विविध कार्यक्रम साजरे होणार आहेत. यामध्ये १५ बाय ४० चा भव्य तिरंगा, अमर जवान थीम, स्वातंत्र्य चळवळीतील कोल्हापूरातील योगदान, देशभक्ती गीत, स्टेज सर्वांसाठी गाणी म्हणायला उपलब्ध असणार आहे. आर्मी जवान सेल्फी, तिरंगा टॅट्यू व संध्याकाळी खाऊ गल्ली असा दिवसभर कार्यक्रम असणार आहे याचा लाभ सर्व शहरवासीयांनी घ्यावा असे आवाहन ट्रस्ट च्या वतीने करण्यात आले आहे. यावेळी राजेंद्र चव्हाण { संस्थापक }. रविंद्र जाधव { अध्यक्ष }सचिन जोशी, ईश्वर पाटील,रोहन गवळी, किरण शिंदे, अजिंक्य कदम, सम्राट शिर्के, शुभम यादव, आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे स्थळ:- मातृभूमी चॅरिटेबल ट्रस्ट संचलित उत्तरेश्वर थाळी,
गंगावेश चौक, कोल्हापूर

Comments
Post a Comment