जांभळीचा अभय भोसले आघाडीवर तर जयसिंगपूर दिव्या व दिशा पाटील भगिनी द्वितीय स्थानावर

 "आंतरभारती चषक" बुद्धिबळ स्पर्धा

जांभळीचा अभय भोसले आघाडीवर तर जयसिंगपूर दिव्या व दिशा पाटील भगिनी द्वितीय स्थानावर



कोल्हापूर २२ सिटी न्यूज नेटवर्क

शिवाजी पार्कमधील मुख्याध्यापक संघाच्या सभागृहात आंतरभारती शिक्षण संस्थेने आयोजित केलेल्या "आंतरभारती चषक" खुल्या पंधरा वर्षाखालील मुला मुलींच्या बुद्धिबळ स्पर्धा आज उत्साहात सुरु झाल्या.कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने होत असलेल्या या स्पर्धेत सांगली जयसिंगपूर इचलकरंजी व स्थानिक कोल्हापूर येथील नामवंत 110 बुद्धिबळपटू सहभागी झाले आहेत यामध्ये 18 बुद्धिबळपटू आंतरराष्ट्रीय गुनांकन प्राप्त आहेत.या स्पर्धेचे उद्घाटन आंतरभारती शिक्षण संस्थेच्या  कार्याध्यक्षा व उद्योजिका पल्लवीताई कोरगावकर व संस्थेचे उपाध्यक्ष जिनरत्न रोटे यांच्या हस्ते बुद्धिबळाच्या पटावर चाल करून करण्यात आले.यावेळीेचे संस्थेचे सचिव,एम एस पाटोळे,स्पर्धा संयोजक भरत शास्त्री,मुख्याध्यापक नेहा कानकेकर,संजय सौदलगे,समन्वयक संध्या वाणी,क्रीडा प्रमुख दगडू रायकर,क्रीडा शिक्षक समीर जमादार,राजेंद्र बनसोडे व सदाशिव र्हाटवळ,आंतरराष्ट्रीय पंच भरत चौगुले,मनीष मारुलकर,आरती मोदी,रोहित पोळ व महेश व्यापारी उपस्थित होते.

स्पर्धेच्या सहाव्या फेरीनंतर चौथा मानांकित जांभळीचा अभय भोसले सहा गुणासह आघाडीवर आहे तर अग्रमानांकित जयसिंगपूरची दिव्या पाटील व द्वितीय मानांकित दिशा पाटील या जुळ्या बहिणी साडेपाच गुणासह संयुक्तपणे द्वितीय स्थानावर आहेत.ईश्वरी जगदाळे सांगली, शौर्य बगाडिया इचलकरंजी, व्यंकटेश खाडे पाटील कोल्हापूर, शंतनु पाटील कोल्हापूर , आराध्य ठाकूर देसाई इचलकरंजी व महिमा शिर्के कोल्हापूर  हे सहा जण पाच गुणांसह संयुक्तपणे तृतीय स्थानावर आहेत.

Comments