विश्व हिंदू परिषदेच्या 35 वर्षाच्या आंदोलनामुळे विशाळगडावरील अतिक्रमण व पशुहत्या बंदी बाबत प्रशासनाचे आदेश

 विश्व हिंदू परिषदेच्या 35 वर्षाच्या आंदोलनामुळे विशाळगडावरील अतिक्रमण व पशुहत्या बंदी बाबत प्रशासनाचे आदेश


कोल्हापूर ०७ सिटी न्यूज नेटवर्क 

विश्व हिंदू परिषद कोल्हापूर गेली 35 वर्षे विशाळगडावरील महाशिवरात्रीला भव्य कार्यक्रम करीत आले आहे. विशाळगडावरील मंदिराचा व ऐतिहासिक स्थळांचा विहिपच्या पुढाकाराने झाले आहेत. विषय गडावरील अतिक्रमण, अस्वच्छता, पशुहत्या, दारूबंदी याबाबत सातत्याने विश्व हिंदू परिषदेने आवाज उठवला असून कित्येक आंदोलने केली आहेत. नुकतेच विशाळगडावरील अतिक्रमणाबाबत विश्व हिंदू परिषदेने घेतलेल्या कठोर भूमिकेमुळे आणि केलेल्या पाठपुराव्यामुळे विशाळगडावरील अतिक्रमण काढण्याचा आदेश शासनाने पारित केला असून त्यासाठी निधीही उपलब्ध करून देण्यात आला आहे. विश्व हिंदू परिषदेच्या आग्रही भूमिकेमुळे गडावर पशुहत्या बंदी झाली असून अतिक्रमण हटवणे व पशुहत्याबाबतचा शासनाचा आदेश पारित झाला आहे हे विश्व हिंदू परिषदच्या आंदोलनाचे मोठे यश आहे. अतिक्रमण आणि पशुहत्या बंदीबाबत झालेल्या आदेशांची तातडीने आणि कठोर अंमलबजावणी व्हावी यासाठी विश्व हिंदू परिषद पाठपुरावा करीत आहे. महाशिवरात्री हा धार्मिक कार्यक्रम असल्याने त्याचबरोबर विशाळगड व पंचक्रोशीतील संघटना नागरिक व ग्रामस्थ यांच्या वतीने आता महाशिवरात्री साजरी होत असलेले असल्याने विश्व हिंदू परिषद बजरंग दल या दिवशी विशाळगडावर कोणत्याही आंदोलन कोणतेही आंदोलन अगर कार सेवा करणार नाही.



विश्र्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या वतीने महाशिवरात्रीला पावनगड पन्हाळा येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन


ज्याप्रमाणे विशाळगडाची अवस्था झाली आहे त्याप्रमाणे पावनगडाची अवस्था होऊ नये म्हणून या वर्षीपासून विश्व हिंदू परिषद बजरंग दल पावनगड, तालुका पन्हाळा येथे महादेव मंदिरामध्ये महाशिवरात्री साजरी करणार असून येत्या १७ तारखेला रात्री नऊ ते बारा भजन व जागर आणि आणि दिनांक १८ रोजी सकाळी सहा वाजता अभिषेक, सकाळी नऊ ते दहा दुर्ग सेवक व गोरक्षक यांचा सत्कार समारंभ होणार असून सकाळी दहा ते अकरा जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांची अकरावी वंशज ह भ प श्री श्री मोरे महाराज (देहू आळंदी) यांचे व्याख्यान होणार आहे. सकाळी ११.३० वाजता महाआरती होऊन सर्वांना महाप्रसाद वाटप होणार आहे. तरी जास्तीत जास्त संख्येने पावनगडाची पावित्र्य टिकवण्यासाठी या महाशिवरात्रीला दुर्गप्रेमी आणि शिवप्रेमींनी पावनगडावर यावे असे निवेदन या पत्रकार परिषदेमध्ये विश्व हिंदू परिषद बजरंग दल तर्फे जिल्हा मंत्री ॲड. सुधीर जोशी वंदुरकर, अध्यक्ष श्री कुंदन पाटील आणि बजरंग दल शहर संयोजक श्री पराग फडणीस, सहसंयोजक श्री अक्षय ओतारी यांनी दिले. यावेळी विश्व हिंदू परिषदचे उपाध्यक्ष शांतीबाई लिंबांनी, शहर मंत्री उत्तम सांडुगडे, राजेंद्र मकोटे, तुषार भिवटे, दुर्गा वाहिनी संयोजिका एडवोकेट सुप्रिया दळवी तसेच अश्विनी माळकर उपस्थित होते.

Comments