गुरूवार, २३ फेब्रुवारी २०२३.
फाल्गुन शुक्ल चतुर्थी. शिशिर ऋतू. शुभकृत नाम संवत्सर. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)
राहुकाळ - दुपारी १.३० ते दुपारी ३.००
"आज दुपारी २.०० पर्यंत चांगला1 दिवस *विनायक चतुर्थी*
चंद्रनक्षत्र: रेवती. आज जन्मलेल्या बाळाची राशी - मीन.
मेष:- लाभदायक दिवस आहे. कोर्टात यश मिळेल. परदेश प्रवास घडेल. काळजीचे कारण नाही.
वृषभ:- अनुकूल दिवस आहे. व्यवसायात दबदबा वाढेल. कामे मार्गी लागतील. आर्थिक परिस्थिती सुधारेल.
मिथुन:- आनंदी दिवस आहे. प्रगतीचा कालावधी आहे. लाभाचे निर्णय होतील. मनासारखी बढती होईल.
कर्क:- अनुकूल दिवस आहे. कामात मन रमेल. धावपळ वाढेल. नवीन ओळखी होतील. प्रवास कार्यसाधक होतील.
सिंह:- संमिश्र दिवस आहे. दगदग वाढेल. वरिष्ठ नाराज होतील. आरोग्य सांभाळा. चोरीचे भय आहे.
कन्या:- आर्थिक लाभ होतील. समाधानकारक कामे होतील. अभंगीदारी व्यवसायात यश मिळेल. जोडधंदा कराल.
तुळ:- प्रगतीचा काळ आहे. व्यवसायात वृद्धी होईल. नवीन कल्पना आकारास येतील.
वृश्चिक:- सिद्धी प्राप्त होतील. वक्तृत्व बहरेल. संतती कडून शुभ समाचार समजतील.
धनु:- महत्वाचे निर्णय होतील. शेतीच्या कामात यश मिळेल. समाजात मान सन्मान मिळतील.
मकर:- उत्तम प्राप्तीचे योग आहेत. राजकारणात यश मिळेल. भावंड मदत करतील. येणी वसूल होतील.
कुंभ:- कठोर भूमिका घ्याल. वक्तृत्व बहरेल. शब्दास जगावे लागेल. कौटुंबिक सुख लाभेल.
मीन:- आत्मविश्वास वाढेल. प्रगती होईल. अभिमान वाटेल. छोटी सहल घडेल.
(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी - 8087520521)
Comments
Post a Comment