रविवारी अशोक कुलकर्णी स्मृती तृतीय भव्य खुल्या जलद बुद्धिबळ स्पर्धा
कोल्हापूर 23 सिटी न्यूज नेटवर्क
कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने कोल्हापूर चेस अकॅडमीने ने रविवार दिनांक 26 फेब्रुवारी रोजी अशोक कुलकर्णी स्मृती तृतीय भव्य खुल्या जलद बुद्धिबळ स्पर्धा आयोजित केल्या आहेत. श्री कृष्ण सरस्वती मंगल कार्यालय,जरगनगर, कोल्हापूर येथे होणाऱ्या या स्पर्धा स्विस लीग पद्धतीने जलद बुद्धिबळाच्या आंतरराष्ट्रीय नियमानुसार एकूण नऊ फेऱ्यात होणार आहेत.कोल्हापुरातील प्रसिद्ध बुद्धिबळपटू कै.अशोक कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ आनंद कुलकर्णी,गुळवणी व ठाकूर परिवाराने या स्पर्धा प्रायोजित केलेले आहेत.या स्पर्धा तिसऱ्यांदा होत आहेत.गेली दोन वर्षे करोनामुळे ही स्पर्धा होऊ शकली नाही.स्पर्धेचे उद्घाटन रविवार दि.26 फेब्रुवारी ला सकाळी साडेनऊ वाजता दैनिक सकाळचे संपादक श्रीराम पवार आणी आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू व भारतातील नामवंत बुद्धिबळ प्रशिक्षक पुण्याचे श्री जयंत गोखले यांच्या हस्ते व महावितरणचे मुख्य अभियंता परेश भागवत व अधीक्षक अभियंता अंकुर कावळे,कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष प्राध्यापक अरुण मराठे व श्री महालक्ष्मी सह.बँकेचे अध्यक्ष विनोद डिग्रजकर यांच्या उपस्थितीत स्पर्धा स्थळी होणार आहे.त्यानंतर स्पर्धेची पहिली फेरी सकाळी दहा वाजता सुरू होईल.
स्पर्धा विजेत्यास रोख सहा हजार रुपये व आकर्षक चषक,उपविजेत्यास रोख 5000 रुपये व चषक तर,तृतीय क्रमांक रोख 4000 रुपये व चषक देऊन सन्मानित केले जाणार आहे अशी एकूण मुख्य दहा बक्षीस आहेत..याशिवाय उत्तेजनार्थ विविध वयोगटात व ज्येष्ठ बुद्धिबळपटू व उत्कृष्ट महिला बुद्धिबळपटू तसेच गुणांकन कॅटेगिरी मध्ये....अशा प्रत्येक गटात रोख, चषक व पदक स्वरुपात बक्षिसे ठेवली आहेत.स्पर्धेत भाग घेण्यासाठी चारशे पन्नास रुपये प्रवेश शुल्क आकारले आहे. तरी इच्छुक बुद्धिबळपटू नी आपली नावे प्रवेश फी सह खालील व्यक्तींकडे नोंदवावीत
सौ.अस्मिता कुलकर्णी - 9923257363 व
बी.एस नाईक - 9422045108
असे मुख्य स्पर्धा संचालक आनंद कुलकर्णी यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे..
Comments
Post a Comment