मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदेचे कोल्हापुरात जंगी स्वागत

 मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदेचे कोल्हापुरात जंगी स्वागत

 


राजेश क्षीरसागर यांच्याकडून मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदेचा १०० फुटी पुष्पहाराने सत्कार

 

कोल्हापूर १९ सिटी न्यूज नेटवर्क 

निवडणूक आयोगाच्या निकालानंतर मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे साहेब प्रथमच कोल्हापूर दौऱ्यावर आज आले. कोल्हापुरात आयोजित पंचमहाभूत लोकोत्सव महाशोभा यात्रेस सहभागी होण्यापूर्वी गंगावेश चौक येथे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर आणि शिवसेना कोल्हापूर जिल्हा व शहर कार्यकारणीच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी राजेश क्षीरसागर यांच्याकडून मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदेचा १०० फुटी पुष्पहाराने सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसैनिकांनी "शिवसेना जिंदाबाद", "शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे", "धर्मवीर आनंद दिघे", "मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे" यांच्या विजयाच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. हजारोंच्या संख्येने जमलेल्या शिवसैनिकांना अभिवादन करून मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे महाशोभा यात्रेत पायी चालत सहभागी झाले. शोभा यात्रा मार्गावर शिवसैनिकांच्या वतीने जागोजागी फुलांचा वर्षाव करण्यात आला. 

यावेळी पालकमंत्री ना.मा.श्री.दीपक केसरकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर, खासदार धैर्यशील माने, मा.आम.चंद्रदीप नरके, युवा नेते ऋतुराज क्षीरसागर, मा.नगरसेवक नंदकुमार मोरे, माजी नगरसेवक राहुल चव्हाण, महानगरप्रमुख शिवाजी जाधव, समन्वयक जयवंत हारुगले, शहरप्रमुख रणजीत जाधव, उपजिल्हाप्रमुख तुकाराम साळोखे, उपजिल्हाप्रमुख रमेश खाडे, किशोर घाटगे, उदय भोसले, यांच्यासह शिवसेना, युवासेना, अंगीकृत संघटना पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Comments