कोल्हापूर शहर राष्ट्रवादीच्यावतीने शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी
कोल्हापूर १९ सिटी न्यूज नेटवर्क
युगपुरुष ,रयतेचे राजे , छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती कोल्हापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. पक्षाचे शहर कार्यालय शिवाय स्टेडियम येथे झालेल्या शिवजयंती सोहळ्यात पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री गणपतराव बागडी सर यांच्या शुभहस्ते शिव पुतळ्याचे पूजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष शहराध्यक्ष आर के पोवार हे होते. पक्षाचे सरचिटणीस सुनील देसाई यांनी स्वागत केले. यावेळी गणपतराव बागडी, आर के पोवार ,आदिल फरास , अनिल घाटगे. यांनी समयोचित भाषणे केली. या कार्यक्रमास अनिल कदम, महेंद्र चव्हाण, जहिदा मुजावर, फिरोज सरगुर, महादेव पाटील , रियाज कागदी, युवराज साळोखे, नागेश फरांडे, राजू मालेकर, ओंकार साठे , निशिकांत सरनाईक , मिरा सरनाईक, सायली महाडिक, सुनिता राऊत, मुसाभाई कुलकर्णी ,श्वेता बडोदेकर, पुंडलिक माने, शितल तिवडे, पप्पू जाधव , यांच्यासह अनेक कार्यकर्ते श्री उपस्थित होते.

Comments
Post a Comment