आजपासून महालक्ष्मी महोत्सवाची सुरुवात : आठ दिवस चालणार हा महोत्सव
कोल्हापूर २६ सिटी न्यूज नेटवर्क
आजपासून महालक्ष्मी महोत्सवाची सुरुवात होणार आहे.राष्ट्रीय संत डॉ. वसंत विजय महाराज यांच्या जयंतीनिमित्त होणाऱ्या हा महोत्सव आठ दिवसीय चालेल. महालक्ष्मी महोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. सुमारे १३ एकर जागेवर उभारण्यात आलेल्या उत्सवाच्या ठिकाणी भव्य कथा पंडाल आणि भव्य १०८ हवन यज्ञ कुटिर पूर्ण झाले आहे.
राष्ट्रीय संत वसंत विजय महाराज यांच्या जयंतीनिमित्त पूज्य धनलक्ष्मी माँ यांच्या पाच हजार पंचधातू मूर्ती दर्शन व पूजनासाठी ठेवण्यात आल्या आहेत. केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांच्या हस्ते या भव्य दिव्य महोत्सवाचे उद्घाटन होईल.या वेळी गरिबांना रेशन आणि ब्लॅकेटचे वाटपही. करणार आहेत. सुवर्णभूमी लॉन, शिरोली टोल नाका येथे हा आठदिवसीय महोत्सव असणार आहे याचा लाभ करवीर वासियानी मोठ्या प्रमाणात घ्यावा असे आवाहन आयोजकानी केले आहे.
Comments
Post a Comment