दैनिक राशिभविष्य

 सोमवार, २० फेब्रुवारी २०२३. 







माघ अमावस्या. शिशिर ऋतू. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)


राहूकाळ- सकाळी ७.३० ते सकाळी ९.०० 


चंद्रनक्षत्र :'धनिष्ठा'  आज अनिष्ट दिवस आहे. सोमवती अमावस्या. (तिथी दुपारी १२.३६ पर्यंत) आज जन्मलेल्या बाळाची राशी - कुंभ. 


मेष:- अनुकूल दिवस आहे. येणी वसूल होतील. उत्तम आर्थिक लाभ होतील. मन प्रसन्न राहील.

     

वृषभ:- कामाच्या ठिकाणी अपमान होऊ शकतो. जबाबदारी वाढेल. विरोधक नामोहरम होतील. 

 

मिथुन:- हितशत्रूंच्या कारवाया वाढतील. अंगावर घेतलेले काम चांगल्यापद्धतीने पार पडाल. शिक्षणात प्रगती होईल.  


कर्क:- उदास वाटेल. वाहने जपून चालवा. आरोग्याची काळजी घ्या. मन शांत ठेवा. ध्यानधारणा करा.

 

सिंह:- जोडीदारासाठी खर्च कराल. भागीदारीत यश मिळेल. सरकारी कामे पुढे सरकतील. नेतृत्वगुण सिद्ध होईल.

  

कन्या:- अधिकाराचा योग्य वपर कराल. आर्थिक प्राप्तीसाठी उत्तम दिवस आहे. मात्र मोठे करार आज नकोत.

 

तुळ:- कामात अडथळे येतील. वादविवाद टाळा. मन शांत ठेवा. स्पर्धेत मात्र यश मिळेल. प्रवासाचे बेत पुढे ढकलले जातील.

 

वृश्चिक:- शेतीची कामे पुढे योग्य वेळेत होतील. जमीन व्यवहारात यश मिळेल. मातेकडून लाभ होतील.  


धनु:- संमिश्र दिवस आहे. धनलाभ होणार आहे. आरोग्य चांगले राहील. मनासारखी बढती/बदली होईल.

 

मकर:- खर्चात वाढ होणार आहे. मात्र त्याची भरपाई देखील होईल. पराक्रम गाजवाल.    

 

कुंभ:- मेजवानी मिळेल. ओळखीतून लाभ होतील. घरात बदल कराल. गुप्तशत्रूपासून सावध रहा. 

 

मीन:- खर्चात वाढ होणार आहे.  संयम बाळगा. क्रोध आवरा. अधिकाराचा दुरुपयोग होऊ देऊ नका. संशयाचे वातावरण नको.



(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी -  8087520521)

Comments