अशोक कुलकर्णी स्मृती तृतीय भव्य खुल्या जलद बुद्धिबळ स्पर्धेत रेंदाळचा श्रीराज भोसले अजिंक्य; सातारचा ओंकार कडव उपविजेता तर कोल्हापूरचा आदित्य सावळकर तृतीय
कोल्हापूर २७ सिटी न्यूज नेटवर्क
श्री कृष्ण सरस्वती मंगल कार्यालय,जरग नगर येथे कोल्हापूर चेस अकॅडमी ने आयोजित केलेल्या अशोक कुलकर्णी स्मृती भव्य खुल्या जलद बुद्धिबळ स्पर्धा संपन्न झाल्या.अंतिम आठव्या फेरीत पहिल्या पटावर द्वितीय मानांकित रेंदाळचा श्रीराज भोसले ने आघाडीवर असलेल्या आठवा मानांकित कोल्हापूरच्या आदित्य सावळकरला नमवून साडेसात गुणासह स्पर्धेचे अजिंक्यपद पटकाविले त्याला रोख सहा हजार रुपये व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले. चौथा मानांकित सातारचा ओंकार कडव ने जेजुरीच्या हर्षल पाटीलला पराभूत करून सात गुणासह या स्पर्धेचे उपविजेतेपद पटकावले त्याला पाच हजार रुपये व चषक देऊन सन्मानित केले तर अंतिम फेरीत पराभूत झालेल्या कोल्हापूरच्या आदित्य सावळकरला सात गुणासह तृतीय क्रमांकावर समाधान मानावे लागले त्याला रोख चार हजार रुपये व चषक देऊन सन्मानिले.
स्पर्धेचा बक्षीस समारंभ विश्वावती आयुर्वेदिक चिकित्सालय चे अध्यक्ष निरंजनदास सांगवडेकर व वसंतराव चौगुले पतसंस्थेचे अध्यक्ष अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर निपाणीचे उद्योगपती व बुद्धिबळ संघटक प्रवीणभाई शहा, जरग नगर मधील सामाजिक कार्यकर्ते पीटर चौधरी, पुण्याचे बुद्धिबळ संघटक नागनाथ हलकुडे, महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे सहसचिव व आंतरराष्ट्रीय पंच भरत चौगुले, मुख्य स्पर्धा संयोजक आनंद कुलकर्णी,अनिल कुलकर्णी व अनुराधा गुळवणी इत्यादी उपस्थित होते.सौ.अस्मिता कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
भरत चौगुले हे स्पर्धेचे मुख्य पंच होते त्यांना इचलकरंजीचे करण परीट, मनीष मारुलकर,सांगलीचे दीपक वायचळ,शाहरुख कुरणे व महेश व्यापारी यांनी सहकार्य केले.
स्पर्धा यशस्वी होण्यासाठी आनंद कुलकर्णी,अनिल कुलकर्णी,अनुराधा गुळवणी,अनिकेत कुलकर्णी,सागर गुळवणी,अभिजीत कुलकर्णी,अस्मिता कुलकर्णी स्वाती कुलकर्णी धीरज वैद्य,ठाकूर परिवार व सुहास कुलकर्णी यांनी अथक परिश्रम घेतले.
स्पर्धेचा अंतिम निकाल व द विजेते पुढीलप्रमाणे
मुख्य बक्षिसे
1) श्रीराज भोसले रेंदाळ 2) ओंकार कडव सातारा 3) आदित्य सावळकर कोल्हापूर 4) प्रणव पाटील कोल्हापूर 5) शंतनू पाटील कोल्हापूर 6) अनिकेत बापट सातारा 7) निहाल मुल्ला कागल 8) सोहम खासबारदार कोल्हापूर 9) योगेश महामुनी पुणे 10) मुद्दसर पटेल मिरज
उत्तेजनार्थ बक्षीस
उत्कृष्ट ज्येष्ठ बुद्धिबळपटू (साठ वर्षावरील)
1) सुरेंद्र सरदार मुंबई 2) माधव देवस्थळी कोल्हापूर 3) भारत पाटोळे निपाणी 4) सुरेश मठ सांगली 5) रविंद्र कुलकर्णी कोल्हापूर
उत्कृष्ट महिला बुद्धिबळपटू
1)दिशा पाटील जयसिंगपूर 2)दिव्या पाटील जयसिंगपूर 3)शर्वरी कबनूरकर कोल्हापूर 4)मेघा धामणगे कोल्हापूर 5) पूजा खोत कोल्हापूर
उत्कृष्ट दिव्यांग बुद्धिबळपटू
सौरभ पाटील सांगली
बाराशे गुणांकनाखालील उत्कृष्ट बुद्धिबळपटू
1)अथर्व तावरे इचलकरंजी 2)व्यंकटेश खाडे पाटील कोल्हापूर 3)अमित मुडगुंडी सोलापूर 4)सर्वेश पोद्दार कोल्हापूर 5)हित बलदवा जयसिंगपूर
चौदाशे गुणांकनाखालील उत्कृष्ट बुद्धिबळपटू
1)वरद आठल्ये कोल्हापूर 2)हर्षल पाटील जेजुरी 3)तुषार शर्मा कोल्हापूर 4)आदित्य आळतेकर कोल्हापूर 5)रियार्थ पोद्दार इचलकरंजी
सोळाशे गुणांकनाखालील उत्कृष्ट बुद्धिबळपटू
1)अभिषेक पाटील मिरज 2) संतोष रसाळ कोल्हापूर 3) प्रदीप आवडे सातारा
नऊ वर्षाखालील उत्कृष्ट बुद्धिबळपटू
1)वेदांत बांगड इचलकरंजी 2)शौर्य बगाडिया इचलकरंजी 3)वेदांत कुलकर्णी पुणे 4)आराध्या ठाकूर देसाई इचलकरंजी 5) आदित्य घाटे कोल्हापूर
बारा वर्षाखालील उत्कृष्ट बुद्धिबळपटू
1) आदित्य चव्हाण सांगली 2) आरव पाटील कोल्हापूर 3) अभय भोसले जांभळी 4) प्रथमेश व्यापारी कोल्हापूर 5) पंकज पाटील सांगली
*पंधरा वर्षाखालील उत्कृष्ट बुद्धिबळपटू*
1) अरीन कुलकर्णी कोल्हापूर 2)नगुरुराज धोंगडे सांगली 3) हर्ष शेट्टी सांगली 4)साद इम्रान बारस्कर शिरोली 5) वेदांत दिवाण कोल्हापूर
*विशेष उत्तेजनार्थ बक्षिसे*
1)दादासाहेब गुरव कोल्हापूर 2)ओवी शेटे कोल्हापूर 3)सदाभाऊ कदम कसबे डिग्रज 4)आनंद कुलकर्णी कोल्हापूर 5) आरव गुळवणी कोल्हापूर
Comments
Post a Comment