दैनिक राशिभविष्य

 मंगळवार, २१ फेब्रुवारी २०२३







फाल्गुन शुक्ल प्रतिपदा, शिशिर ऋतू. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)


राहुकाळ - दुपारी ३.०० ते दुपारी ४.३० 


"आज क्षय दिन आहे.


चंद्रनक्षत्र - शततारका/ पूर्वा भाद्रपदा. आज जन्मलेल्या बाळाची राशी - कुंभ. 


टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.


मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) लाभाचे करार होतील. उत्तम आर्थिक प्राप्ती होईल. मन कठोर होईल. आक्रमक भूमिका घ्याल. 

     

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) संमिश्र दिवस आहे. विनाकारण वैर निर्माण होईल. कामाच्या ठिकाणी वादविवादाचे प्रसंग येतील.

 

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) कामानिमित्त भ्रमंती करावी लागेल. मन अस्वस्थ राहील.  प्रवासात त्रास संभवतो.


कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) ग्रहमान संमिश्र आहे. उष्णतेचे विकार होतील. काळजी घ्या. मन शांत ठेवा. वाहन जपून चालवा.  

 

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) जोडीदाराशी वाद होऊ शकतात. गैरसमज होऊ देऊ नका. घरात शांतता राखा. प्रेमात अपयश येईल.

  

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) अनुकूल दिवस आहे. कामे मार्गी लागतील. अचानक धनलाभ होईल. अंदाज अचूक ठरतील.

 

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) महत्वाची कामे आज नकोत. कामात अडथळे येतील. फसवणूक होण्याची शक्यता आहे.

 

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु)  कामात अडथळे येतील. नियोजनात बदल करावे लागतील. चोरा पासून धोका संभवतो. 


धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे)  सुखाचा दिवस आहे. येणी वसूल होतील. कोर्टात यश मिळेल. मन आनंदी राहील.

 

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) बोलण्यात मृदुपणा ठेवा. गुप्त शत्रूंपासून सावध रहा. महत्वाची कामे आज नकोत.  


कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) मन अस्वस्थ राहील. उपासना केल्यास चांगले फळ मिळेल. क्रोधावर नियंत्रण ठेवा. भावंड मदत करतील.

 

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची)  अंदाज चूकतील. वाद विवादाचे प्रसंग येतील. आरोग्याचा त्रास जाणवेल. नमते घ्या. 


(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी -  8087520521)

Comments