रिलायन्स फाऊंडेशन दृष्टी'ची सामाजिक दायित्वा प्रति दोन दशके पूर्ण; दृष्टीहिनांसाठी मराठी ब्रेल वृत्तपत्र सुरू



'रिलायन्स फाऊंडेशन दृष्टी'ची सामाजिक दायित्वा प्रति दोन दशके पूर्ण;  

दृष्टीहिनांसाठी मराठी ब्रेल वृत्तपत्र सुरू





• २०,५०० हून अधिक मोफत कॉर्नियल प्रत्यारोपण यशस्वी 

• मराठी पाक्षिक 'दृष्टी'च्या रूपात आंतरराष्ट्रीय हिंदी आवृत्तीनंतरचे दुसरे ब्रेल वृत्तपत्र

• असुरक्षित समुदायातील १.७५ लाखांहून अधिक लोकांना बहुविध उपक्रमाद्वारे लाभ


मुंबई, १७ सिटी न्यूज नेटवर्क 


'रिलायन्स फाऊंडेशन दृष्टी' या सर्वसमावेशक दृष्टी निगा उपक्रमांतर्गत मराठी भाषेत ब्रेल वृत्तपत्र सुरू करून मैलाचा दगड म्हणून दोन दशके सेवा नुकतीच पूर्ण केली. दृष्टी उपक्रमांतर्गत विविध २०,५०० हून अधिक मोफत कॉर्नियल प्रत्यारोपण यशस्वीपणे करण्यात आले आहे. तसेच १.७५ लाखांहून अधिक लोकांना सेवा प्रदान करण्यात आली आहे.


“रिलायन्स फाऊंडेशन दृष्टी"ने २० वर्षे पूर्ण केल्याचा आम्हाला आनंद आहे. दृष्टिहीनांच्या जीवनात प्रकाश, आनंद आणि आत्मनिर्भरतेचे स्वप्न म्हणून सुरू झालेली मोहीम आज एक चळवळ बनली आहे”, असे रिलायन्स फाउंडेशनच्या अध्यक्ष श्रीमती नीता अंबानी म्हणाल्या. “येत्या दशकांमध्ये, आम्ही आमच्या दृष्टिहीन समुदायांना सन्मानाने आणि स्वातंत्र्य पूर्ण जीवन जगण्यासाठी सर्वतोपरी साहाय्य करण्यासाठी वचनबद्ध आहोत. या दिशेने आणखी एक पुढचे पाऊल म्हणून व्यापक प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि अधिक प्रभाव पाडण्यासाठी हिंदी व्यतिरिक्त मराठीतील ब्रेल 'दृष्टी' वृत्तपत्र सुरू करताना आम्हाला आनंद होत आहे.”, असेही त्या म्हणाल्या.


२००३ मध्ये सुरू केलेला 'रिलायन्स फाऊंडेशन दृष्टी' हा उपक्रम समाजात जागरूकता वाढवून दृष्टीविषयक संरक्षण करत दृष्टिहीनांसाठी आवश्यक अशा सर्वसमावेशकतेला प्रोत्साहन देते. संपूर्ण भारतभर नेत्र तपासणी शिबिरे आयोजित केली जातात. दृष्टी दोष असणाऱ्यांना चष्माही दिला जातो. दृष्टी पुनर्संचयित करण्यासाठी किंवा सुधारण्यासाठी मोतीबिंदू काढणे आणि कॉर्नियल प्रत्यारोपण सुलभ केले जाते. नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड, शंकरा नेत्र फाउंडेशन आणि अरविंद आय केअर यांच्या संयुक्त विद्यमाने प्रत्यारोपण केले जाते.


या उपक्रमाद्वारे भारतातील एकमेव पाक्षिक आंतरराष्ट्रीय ब्रेल वृत्तपत्र हिंदीत २०१२ मध्ये सुरू झाले. तसेच ते आता मराठीत सुरू झाले आहे. नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंडच्या सहकार्याने त्याची निर्मिती होत असून प्रख्यात संपादक आणि लेखक श्री. स्वागत थोरात हे वृत्तपत्राचे मुख्य संपादक आहेत. 'दृष्टी' वृत्तपत्रात क्रीडा, व्यवसाय, शिक्षण, चालू घडामोडी आणि मनोरंजन क्षेत्रातील वृत्त समाविष्ट आहेत. तसेच वाचकांचे पाककृती ,कविता, लेख आदींचे योगदान देखील आहे. प्रत्येक वर्षाच्या सुरुवातीस वाचकांना ब्रेल टेबल कॅलेंडर वितरित केले जाते. भारतासह १६ देशांमध्ये २४,००० वाचक संख्या आहे. वृत्तपत्राची मराठी ब्रेल आवृत्ती अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल.




नेत्रदानाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी 'दृष्टी', रिलायन्स कर्मचाऱ्यांची मुले आणि नातवंडांसाठी अंतर्गत वार्षिक निबंध लेखन आणि कला स्पर्धा आयोजित करते.


महाराष्ट्रातील लातूर येथील २४ वर्षीय गंगाराम सदानंदे याची रिलायन्स फाऊंडेशन दृष्टीच्या माध्यमातून दृष्टी पुनर्संचयित करण्यात आली. त्याला अंधत्व आले आणि परिणामी शाळा सोडावी लागली. कॉर्नियल प्रत्यारोपण प्रक्रिया होईपर्यंत दैनंदिन कामासाठी तो आईवर अवलंबून होता. आता तो स्पष्ट पाहू शकतो आणि स्वतः ऑटो रिक्षा चालवून उदरनिर्वाह करतो.


'रिलायन्स फाऊंडेशन दृष्टी' ही सर्वसमावेशकतेला चालना देण्यासाठी दिवे आणि इतर भेटवस्तू यासारखी उत्पादने खरेदी करून दृष्टीदोष असलेल्यांच्या उद्योजकीय प्रयत्नांना पाठबळ देण्यासाठी सनराईज कॅंडलसारख्या संस्थांच्या निकट सहकार्याने कार्य करते.



Follow Reliance Foundation on social media: 

Twitter: @ril_foundation

Facebook: @foundationRIL 

LinkedIn: reliancefoundation 

Instagram: @RelianceFoundation

Comments