पंचगंगा हॉस्पिटल मधील महिला कर्मचाऱ्यांचा "आप" कडून सन्मान
कोल्हापूर ०८ सिटी न्यूज नेटवर्क
महिला दिनाचे औचित्य साधून आम आदमी पार्टीच्या वतीने पंचगंगा हॉस्पिटल मधील महिला कर्मचाऱ्यांना सदिच्छा भेट देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. त्याच बरोबर 'आप' महिला आघाडी तर्फे हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी आलेल्या गरजू महिलांना सॅनिटरी नॅपकिन वाटप करण्यात आले. कायाकल्प पुरस्कारासाठी महाराष्ट्र शासनाकडून पंचगंगा हॉस्पिटल नॉमिनेट झाल्याबद्दल तसेच हॉस्पिटलच्या स्वच्छतेसाठी थ्री बकेट संकल्पना राबवल्याबद्दल डॉ. काळे आणि कर्मचारी वर्ग यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले.
या कार्यक्रमाला महिला आघाडी शहराध्यक्षा अमरजा पाटील, डॉ. उषा पाटील, पूजा आडदांडे, स्नेहा पटके, श्रद्धा भोसले याच बरोबर प. महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई, अभिजीत कांबळे, राकेश गायकवाड, दुष्यंत माने, भाग्यवंत डाफळे उपस्थित होते.


Comments
Post a Comment